Dindori Assembly Elections : दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ हेच उमेदवार : सुनील तटकरे

Dindori Assembly Elections : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगून दिंडोरीतील उमेदवारीसंदर्भात होणाऱ्या चर्चांना विराम दिला.
NCP leader Narahari Jirwal will contest the upcoming Dindori assembly elections - MP Sunil Tatkare.
NCP leader Narahari Jirwal will contest the upcoming Dindori assembly elections - MP Sunil Tatkare.esakal
Updated on

Dindori Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगून दिंडोरीतील उमेदवारीसंदर्भात होणाऱ्या चर्चांना विराम दिला. दरम्यान, राज्यातील जनतेसाठी महायुती सरकारने एक लाख हजार कोटी रुपयांच्या योजना राबविल्या असून, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बिल सरसकट माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Sunil Tatkare statement of is only candidates from Dindori Constituency Narhari Jhirwal )

त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या सन्मान यात्रेत तटकरे बोलत होते. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, ‘कादवा’चे संचालक बाळासाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील आदी उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, की अजित पवार यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार असून, मुलींना मोफत शिक्षण व उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद, अशा कितीतरी योजना राबविल्या जात आहेत. नरहरी झिरवाळ म्हणाले, की मतदारसंघाच्या हितासाठी आपण सदैव अजित पवारांसोबत असून, मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आदी प्रश्न सोडविण्यावर आपला भर असेल.

युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, विश्‍वासराव देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, कैलास मवाळ, गोपीनाथ पाटील, अशोक टोंगारे, कृष्णा मातेरे, नामदेव हलकंदर, संगीता राऊत, लताबाई बोरस्ते, विलास कड, एकनाथ गायकवाड, कचरू पाटील, नरेंद्र पेलमहाले, जगदीश जाधव, विलास काळे, अविनाश जाधव, रावसाहेब संधान, बापूराव पडोळ, तुषार वाघ, त्र्यंबक निखाडे, शहाजी सोमवंशी, नीलेश पेलमहाले, संपत कड, राहुल कावळे, भास्कर आहेर, संदीप गोतरणे, संतोष डोमे, गिरीश गावित. (latest marathi news)

NCP leader Narahari Jirwal will contest the upcoming Dindori assembly elections - MP Sunil Tatkare.
Dindori Lok Sabha Election : 2 मतदान केंद्रांचे अंतर सव्वादोनशे किलोमीटर; जळगाव आणि अहमदनगरच्या हद्दीपर्यंत विस्तार

परिक्षित देशमुख, बबन जाधव, अजित कड, रामभाऊ घडवजे, विष्णू पाटील, सत्यजित राजे, दीपक जाधव, डॉ. विजय गटकळ, राहुल गायकवाड, बापू तासकर, प्रतीक पाटील, दुर्गेश चित्तोडे, मधुकर भरसट, मनोज शर्मा, आर. के. खांदवे, मंगेश पवार, नितीन भालेराव, अमोल पवार, पिनू मौले, हिरामण गावित, सलीम मिर्झा, जहीर शेख, सफिराज तांबोळी, सोमनाथ बस्ते, आरिफ शेख, जुलील शेख, मोसीन शेख, इरफान शेख, जमीर शेख, दिलावर तांबोळी, सचिन कावळे, हृषीकेश देशमुख,आस्करी मिर्झा, अल्ताफ शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. योगेश गोसावी यांनी, तर आभार कृष्णा मातेरे यांनी मानले.

लाखाचे मताधिक्क्य द्या; कोकाटेंना मंत्रिपद देऊ

सिन्नर : येथील सन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करीत असताना कोकाटे यांच्या विकासकामांच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. या वेळी कोकाटे यांना मंत्रिपद देण्याची मागणीही करण्यात आली. त्या वेळी तटकरे यांनी यंदा सिन्नर मतदारसंघातून कोकाटे यांना एक लाखाचे मताधिक्य द्या, त्यांना मंत्रिपद देऊ, असे सांगितले.

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली तटकरे यांच्या सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, सुरेश चव्हाण, गौरव गोवर्धने, योगेश मिसाळ, सीमंतिनी कोकाटे, नरेश अरोरा यांच्यासह मान्यवर व मोठ्या समूहाने कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP leader Narahari Jirwal will contest the upcoming Dindori assembly elections - MP Sunil Tatkare.
Dindori Lok Sabha Election 2024 Result : कांदान कया भाजपना वांदा; दिंडोरीमा कांदांन वाजी तुतारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.