Nashik NMC : निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण!

Nashik News : गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेची फेरआखणी करताना अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या.
NMC Nashik
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : २००९ मध्ये गोदावरी व उपनद्यांना आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूररेषेपैकी गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेची फेरआखणी करताना अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या. गोदावरी प्रदूषण नियंत्रण संदर्भात महापालिका स्तरीय उपसमितीची बैठक आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (Survey of unauthorised construction in blue flood line)

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत, डॉ. मयूर पाटील, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एल. एस. बाड, महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनायत, नगर नियोजन सहसंचालक कल्पेश पाटील, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे.

अशासकीय सदस्य राजेश पंडित, निशिकांत पगारे, स्मार्टसिटी कंपनीचे उपव्यवस्थापक कृष्णकुमार झा, प्रकल्प व्यवस्थापक आर. एस. हिरे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी एन. डी. चौधरी, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आदी या वेळी उपस्थित होते. गोदावरी नदीची प्रदूषण पातळी रोखण्यासाठी प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापालिकांच्या शाळांमधून प्लॅस्टिक विरोधी जनजागृती मोहीम, तसेच प्रबोधन उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर नियंत्रण करण्यासाठी पूररेषाचे सीमांकन केले जावे. यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करण्याचे व ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्लॅस्टिक व्यवस्थापन व नियोजन समिती कार्यरत करून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik News : कडवा धरणातून तात्काळ आवर्तन सोडावे; आमदार कोकाटे यांची मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांना विनंती

यंदाही पर्यावरणपूरक गणेश उत्सव

स्वातंत्र्य दिनी गोदावरी संवर्धन व प्रदूषण मुक्तीची शपथ सर्व शासकीय व महापालिका कार्यालय तसेच शाळांमध्ये घेतली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव व साजरा करण्याचा यंदाही पुन्हा मानस व्यक्त करण्यात आल्या असून, शाडू मातीचा व पर्यावरणपूरक मातीच्या वापराबद्दल जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाणवेलीमधून उत्पादन

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली तयार होत असल्याने वारंवार उपाययोजना करूनही पाणवेली नष्ट होत नाही. त्यामुळे केरळच्या धरतीवर पाणवेलींपासून उत्पादन करता येईल का याची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर गोदावरी नदीत मिसळणारे २२ नाल्यांना भेटी दिल्या जाणार आहे. रामतीर्थ व गोदापात्रातील काँक्रिटीकरण काढण्याच्या सूचना अशासकीय सदस्यांनी केली.

NMC Nashik
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.