Nashik News : माजी आयपीएस अधिकारी, त्यांच्या पत्नी व मुलाला धमकावत संशयित सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने १० कोटींची मागणी केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत संशयित सून व तिच्या प्रियकराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा रोशन पाटील, अजिंक्य पाटील (दोघे रा. करावे, नेरुळ, नवी मुंबई) अशी खंडणी मागणाऱ्या दोन संशयितांची नावे आहेत. (suspected daughter in law demanded Rs 10 crore)
सध्या निवृत्त असलेले आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील (वय ६५, रा. कर्मयोगीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची सून स्नेहा ही फिर्यादींसह कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांची प्रतिमा मलीन करीत आहे.
पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलाला धमकावून नातू सम्राट याला भेटायचे असल्यास नवी मुंबईत फ्लॅट, आलिशान कार व दहा कोटी रुपये देण्याची मागणी केली. (latest marathi news)
पाटील यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच, त्यांच्या दागिन्यांचाही अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदरचा प्रकार २०१६ ते ७ मे २०२४ या दरम्यान घडला. या प्रकरणी अंबड पोलिसांत खंडणीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक किरण शेवाळे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.