Nashik Abortion Case: नाशिकमधील रुग्णालयात गर्भपाताचा संशय! वैद्यकीय पथक पंड्या रुग्णालयातील औषधांचा घेणार शोध

Latest Crime News : चौकशीचे अधिकार असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाशी पत्रव्यवहार करून सखोल चौकशी करून गर्भपाताची औषधे कोठे उत्पादित होतात व शहरात किती ठिकाणी वितरित होतात, याची माहिती महापालिकेतर्फे घेतली जाणार आहे.
abortion
abortionesakal
Updated on

Nashik Abortion Case : महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये ३० वर्षांपासून अवैधरीत्या गर्भपात होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर आता या रुग्णालयात सापडलेली गर्भपाताची औषधे कुठून आली, याचा शोध घेतला जात असून, त्या आधारे शहरात अनेक ठिकाणी गर्भपात होत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय विभागाने काढला आहे.

त्याच अनुषंगाने चौकशीचे अधिकार असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाशी पत्रव्यवहार करून सखोल चौकशी करून गर्भपाताची औषधे कोठे उत्पादित होतात व शहरात किती ठिकाणी वितरित होतात, याची माहिती महापालिकेतर्फे घेतली जाणार आहे. (Nashik Suspicion of abortion in hospital in city)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.