NMC News : निष्कर्ष न काढताच चौकशी समिती गुंडाळली? जाहिरात फलक घोटाळ्याचा संशय वाढला

NMC : महापालिकेच्या जागेत २८ जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी असताना तब्बल ६३ ठिकाणी फलक उभारल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसुल बुडण्याबरोबरच चुकीचे काम झाल्याचा आरोप झाला.
NMC
NMCesakal
Updated on

NMC News : महापालिकेच्या जागेत २८ जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी असताना तब्बल ६३ ठिकाणी फलक उभारल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसुल बुडण्याबरोबरच चुकीचे काम झाल्याचा आरोप झाला. यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार गठित केलेल्या समितीने अद्यापपर्यंत कुठलाच निष्कर्ष काढलेला नाही. (nashik nmc marathi news )

त्यामुळे समितीचे कामकाज गुंडाळल्याचे बोलले जात असल्याने जाहिरात फलक घोटाळ्यासंदर्भातील संशय अधिक वाढला आहे. महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने खुल्या जागांवर २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. निविदेच्या अटी व शर्तींमध्ये फक्त खुल्या जागेत २८ ठिकाणी जाहिरात फलक उभे करण्याचे नमूद होते.

परंतु संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देताना खुल्या जागेसह रस्ते, दुभाजक, वाहतूक बेटे, इमारती, उद्याने, सर्व प्रकारच्या वापरात नसलेल्या व वापरात असलेल्या जागा व बांधीव मिळकतीवर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी दिली. निविदेत फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना कार्यारंभ आदेशामध्ये मात्र जाहिरात फलकांसोबत प्रकाशित फलक, युनिपोल, एलईडी वॉल या सर्वांना परवानगी दिली.

त्यामुळे शहरात २८ ऐवजी ६३ जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लागल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केला होता. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी जाहिरात फलक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली. त्यात निविदेतील अटी व शर्तींमध्ये करण्यात आलेल्या बदलांची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

NMC
NMC News : शहरात 7 वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय

पुरावे देवूनही कारवाई नाही

२८ होर्डिंगची परवानगी असताना ६३ होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचे पुरावे वेल्फेअर असोसिएशनने समितीला दिले. त्यानुसार संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना अद्याप कुठलीच कारवाई होत नसल्याने समितीकडून ठेकेदाराला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

समितीचा चौकशी प्रवास

- असोसिएशनकडून आरोपानंतर ३१ जानेवारीला आयुक्तांकडून समिती गठित.

- ७ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना.

- माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी असोसिएशनकडून सात दिवसांची मुदतवाढीची मागणी.

- समिती अध्यक्ष अतिरिक्त आयुक्तांकडे असोसिएशनचा तक्रार अर्ज.

- अद्याप चौकशी समितीकडून अहवाल सादर नाही.

- लोकप्रतिनिधींकडून दखल, मंत्रालयात तक्रार.

NMC
NMC News : थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर; 20 नळ जोडण्या तोडल्या

निनावी अर्जातून व्यथा

चौकशी समिती गठित झाल्यानंतर सहा विभागातून आयुक्तांच्या नावे निनावी पत्र आल्याचे समजते. त्यात होर्डिंग्जला परवानगी देण्यासंदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आमचा या प्रकरणाशी कुठलाच संबंध नसल्याची कबुली देताना वेल्फेअर असोसिएशनने ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे बोलले जात आहे.

समितीकडून झुकते माप

वेल्फेअर असोसिएशनने ज्या होर्डिंग्ज कंपनीवर आरोप केले, त्या कंपनीकडून रेकॉर्डवर तसेच स्पॉटवरून होर्डिंग्ज उतरविल्याचे समजते. याचाच अर्थ समितीकडून झुकते माप दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

आमदार अभिप्राय वादात

जाहिरात फलक लावण्यासंदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी त्यांच्या लेटरहेडवर महापालिका आयुक्तांना जाहिरात फलक लावण्यासंदर्भात अभिप्राय दिला. वाहतूक बेटे व सार्वजनिक जागेत फलक लावले जात असल्याने सौंदर्यात भर पडत असल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आल्याने तो अभिप्राय आता जाहिरात घोटाळ्याच्या निमित्ताने वादात सापडला आहे.

विशेष म्हणजे मक्तेदाराचे समर्थन करण्यासाठी लेटरहेडवरील मजकुराचा शब्दांकन एकसारखे असल्याने दोन्ही आमदारांचा नियमबाह्य जाहिरात फलकांना पाठिंबा आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (latest marathi news)

NMC
NMC News : महापालिकेविरोधात अवमान याचिका; मनपाकडून झाडांचे बुंध्यांचे काँक्रिटीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.