Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

Nashik News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी (ता. २२) व रविवारी (ता. २३) बारामतीत राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी (ता. २२) व रविवारी (ता. २३) बारामतीत राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती घोषित होण्याची शक्यता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी वर्तवली. (Swabhimani Shetkari Sanghatana was now called state executive meeting in Baramati)

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. त्यांच्यासह राज्यातील ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांचा झालेला पराभव पक्षनेतृत्वाच्या जिव्हारी लागला आहे. यासंदर्भात मंथन करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता. १६) राज्यातील कार्यकर्त्यांची ऑनलाइन बैठक घेतली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनमताचा कौल लक्षात घेऊन नवी राजकीय भूमिका घ्यावी. यावर विचारमंथन करण्यासाठी बारामती येथे २२ व २३ जूनला दोनदिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक होणार आहे. यामुळे बारामतीतून ‘स्वाभिमानी’ काय एल्गार करते, याकडे लक्ष लागून आहे. (latest marathi news)

Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

"राज्यातील ४० विधानसभा मतदारसंघांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. बारामतीत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत आम्ही सखोल विचारमंथन करून नव्या जोमाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत." - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!
Nashik Police Station : शहरातील वर्दळीतल्या ‘पोलिस चौक्या’ नावालाच! बंद चौक्यामुळे तक्रारदारांची गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.