नाशिक रोड : गुजरात येथील नर्मदा किनाऱ्यावरून भरूच या ठिकाणावरून थेट साडेपाचशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिर्डी येथे विश्वगुरू स्वयंसाई गुरुजी गेल्या 47 वर्षापासून दरवर्षी उलटे चालत वारी पूर्ण करीत आहे. या सबंध प्रवासात ते एकटेच असून रस्त्यात भेटणारे भाविक त्यांची श्रद्धेने सेवा करीत आहे. (Swayam Sai guruji reverse foot wari from Gujarat to Shirdi)
शिर्डीच्या साईंसाठी देश विदेशातून लोक पायी वारी करतात अनेक श्रद्धाळू भाविक वेगवेगळ्या पद्धतीने आपला नवस देवाला कबूल केलेले मागणे पूर्ण करीत असतात. गुजरात राज्यामधील भरूच या ठिकाणाहून थेट शिर्डीला उलटे चालत येणारे स्वयंसाई गुरुजी वर्षातून पाच वेळा उलटे चालत थेट शिर्डीला पोहोचतात.
सत्तर वर्षे वय असणारे स्वयंसाई गुरुजी यांची उलटे पायी चालणाऱ्या शिर्डीची वारी सध्या नाशिककरांचा निरीक्षण बिंदू बनली आहे. रस्त्याने चालताना अनेक भाविक त्यांचे विचारपूस करीत आहे. (latest marathi news)
वर्षातून राम नवमी, गुरुपौर्णिमा ,दसरा, दीपावली, दत्त जयंती या महोत्सवाला ते पाठमोऱ्या अवस्थेत उलटे चालत आहे सध्याची ही त्यांची वारी गुरुपौर्णिमेची असल्यामुळे अनेक भाविक नाशिककर त्यांची मोठ्या भक्तीभावाने सेवा करीत आहेत. भरूच या ठिकाणी त्यांनी मिनी शिर्डी तीर्थ धाम तयार केले आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तीभावाने येत असतात. ही वारी ते 20 ते 22 दिवसात पूर्ण करतात.
"वर्षातून पाच वेळा मी उलटे चालून ही वारी पूर्ण करीत असतो. महाराष्ट्रातले लोक माझ्यावर अपार प्रेम करतात, दरवर्षी ठिकाणे ठरलेली असतात. भाविक मोठ्या भक्तीभावाने मला आधार देत असतात." - स्वयंसाई गुरुजी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.