Nashik News : डेंगी, साथीच्‍या आजारांवर उपाययोजना करा!

Nashik News : शहरात डेंगी व साथीच्‍या आजारांवर तातडीने उपाययोजना कराव्‍यात, अशी मागणी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्‍ते यांनी महापालिका आयुक्‍त डॉ. अशोक करंजकर यांच्‍याकडे केली आहे.
A Shiv Sena delegation giving a statement to Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
A Shiv Sena delegation giving a statement to Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar. esakal
Updated on

Nashik News : शहरात डेंगी व साथीच्‍या आजारांवर तातडीने उपाययोजना कराव्‍यात, अशी मागणी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्‍ते यांनी महापालिका आयुक्‍त डॉ. अशोक करंजकर यांच्‍याकडे केली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळसासोबत आयुक्‍तांची भेट घेताना निवेदनदेखील दिले. (Take measures against dengue epidemics)

निवेदनात म्‍हटले आहे, की पावसाळा सुरू झालेला असताना, सर्वत्र मोठ्या प्रमाणात डेंगी व साथीचे आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जून महिन्यात डेंगीचे १६१ रुग्ण सापडले असून आतापर्यंत २ जणांचा बळी गेला आहे. नाशिक शहरात गेल्या वर्षी १ हजार ९९१ डेंगीचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३ जणांचा डिसेंबर २०२३ मध्ये बळी गेला. यावर्षी मेपर्यंत ३९ रुग्णाची नोंद झाली होती.

त्यामुळे या आजारांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असून महापालिका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्या आधी महापालिका या आजारांवरील उपाययोजनेसाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. महापालिकेची पेस्ट कंट्रोल यंत्रणा काय करते आहे, महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये पुरेशी औषधयोजना आहे का नाही तपासणे आवश्यक आहे.

घरांच्या, सार्वजनिक ठिकाणांच्या अवतीभवती अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, जुने टायर यासारख्या वास्तूमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे महापालिकेने नष्ट करावी. शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविणे, रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेले पाणी, नाल्यांची साफसफाई. (latest marathi news)

A Shiv Sena delegation giving a statement to Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

नदीपात्रात वाढलेली पानवेली त्वरित काढले सर्वत्र औषध फवारणी व धूर फवारणी करणे आवश्यक आहे. डेंगी व साथीच्या आजार लागण झाल्यास उपचार महापालिकेच्या कोणत्या आरोग्य केंद्रात मिळेल किंवा संबंधित आजारावर कोणकोणती औषध उपचार केले पाहिजे, त्याची माहिती मिळवण्यासाठी महापालिकेने नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करावी.

अशा विविध मागण्या केल्‍या आहेत. निवेदन देताना शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, आर. डी. धोंगडे, सुदाम डेमसे, शामकुमार साबळे, भागवत आरोटे, प्रताप मेहरोलिया, माजी नगरसेविका संगीता जाधव, सुवर्णा मटाले, जयश्री खर्जुल, पूनम मोगरे, श्याम खोले, दिगंबर मोगरे, नितीन खर्जुल आदी उपस्‍थित होते.

A Shiv Sena delegation giving a statement to Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar.
Nashik Accident News : 'एक्साईज'चे वाहन उलटून चालक ठार; मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतानाची घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.