Nashik News : महसूल विभागातील ग्रामस्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामात राज्य शासनाने बदल केला आहे. तलाठ्यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखण्यात येणार असून, कोतवालांना महसूल सेवक म्हणून संबोधण्यात येईल. शासकीय कार्यालयांमधील अव्वल कारकून यांचेही पदनाम बदलण्यात आले असून, त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे. (Talathi Kotwal Top Clerk Names Extinct Change)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीनंतर महसूल विभागाने पदनामातील बदलांचे तीन शासन निर्णय जारी केले. त्यानुसार तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामातील हे बदल सुचविले आहेत. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल ही प्रचलित नावे आहेत. सर्वांना परिचित असलेल्या या पदांच्या नामात बदल झाल्याने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या माध्यमातून केला आहे. (latest marathi news)
७२५ तलाठी, ५३४ कोतवाल
जिल्ह्यात महसुली गावांची संख्या एक हजार ९३१ इतकी असून, त्यासाठी ७२५ तलाठी नियुक्त केले आहेत. यात १८२ तलाठ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ९६ तलाठी सर्वसाधारण व ८६ तलाठ्यांना पेसांतर्गत ४१ हजार ८९५ रुपये मानधनावर नियुक्ती देण्यात आली. तसेच जिल्ह्यात ५३४ कोतवाल आहेत.
"संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्याचा शासनाने विचार करून तलाठी हे पदनाम बदलले आहे. त्याबद्दल शासनाचे आभारी आहोत."
- नीलकंठ उगले, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.