Nashik Road Damage : महिनाभरातच निघाले रस्त्यावरचे डांबर; तळवाडे दिगर परिसरात संताप

Nashik News : डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ एकच महिना उलटला असताना वटार फाटा ते वटार ह्या रस्त्यावरचे डांबर जागोजागी निघाल्याने रस्ता उखडला आहे.
Road Damage
Road Damageesakal
Updated on

Nashik News : डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ एकच महिना उलटला असताना वटार फाटा ते वटार ह्या रस्त्यावरचे डांबर जागोजागी निघाल्याने रस्ता उखडला आहे. साइड पट्ट्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. सर्वत्र खड्ड्यांचेच साम्राज्य असल्याने वाहन चालवायचे कसे, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाने सुमारे एक कोटी रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामासाठी दिला असून काम मात्र निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. (Talwade Digar area road damage within month)

पावसाळा सुरू असला तरी अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसातच रस्त्यावरचे डांबर वाहिल्याने स्थानिकांसह नोकरदारांची, भाजीपाला उत्पादक शेतकरी यांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय अजून पावसाळा बाकी असून रस्त्याच्या अवस्थेचा विचारच न केलेला बरा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

आधीच रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यात रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या एकच महिन्यात पुन्हा रस्ता खराब झाल्याने संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने अनेक ठिकाणी डांबर निघाले आहे. साइड पट्ट्या अपूर्ण अवस्थेत सोडून देत पळ काढला आहे. अवघ्या काही दिवसांत हे डांबरीकरण जागोजागी उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने त्यामध्ये पाणी साचत आहे.

नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर बारीक खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे, असे कोणीही म्हणणार नाही. (latest marathi news)

Road Damage
Nashik Sharad Pawar : मालोजीराव संकट काळातील लढवय्ये नेते : शरद पवार

वळणावर असलेले बिनकठड्याचे पूलही अत्यंत धोकादायक आहेत, या रस्त्यावर पुलाला संरक्षक कठडेच केलेले नाहीत. पुलाचा कठडा आणि रस्ता समतल असल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही मागणी नागरिक करत आहेत.

"अनेक वर्ष खराब रस्त्यामुळे आम्ही हाल सहन केले. आता रस्ता झाल्याने गैरसोय दूर होईल, असे वाटले होते. परंतु एकाच महिन्यात डांबरीकरण जागोजागी उखडले आहे. कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे. यंदा मोठा पाऊस झालेला नाही तरीही रस्त्याची दुरवस्था झाली आहे." - मनोज बागूल, ग्रामस्थ.

Road Damage
Nashik Police Transfers : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! काही प्रभारींवर विश्वास, काही नियंत्रण कक्षात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.