Nashik Water Crisis : तृषार्त हरणांसाठी टॅंकरने वॉटर होलमध्ये पाणी! वनविभागाकडून व्यवस्था; अल्प पावसामुळे पाणीटंचाई

Nashik News : यावर्षी अल्प पावसामुळे जंगलातील जलस्रोत केव्हाच कोरडे झाले असल्याने वन्यजीवांची असह्य झालेल्या उन्हात काहिली होत आहे.
Water being pumped into water holes for deer in Rajapur area.
Water being pumped into water holes for deer in Rajapur area.esakal
Updated on

येवला : यावर्षी अल्प पावसामुळे जंगलातील जलस्रोत केव्हाच कोरडे झाले असल्याने वन्यजीवांची असह्य झालेल्या उन्हात काहिली होत आहे. पाण्यासाठी तसेच, चाऱ्यासाठी भटकंती होत असल्याने वनविभागाने जंगलातील सुमारे १८ वॉटर होलमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून, याचा आधार वन्यजीवांना मिळत आहे. (Nashik Tanker water in water hole for thirsty deer marathi news)

वाढत्या उन्हामुळे डोंगर तप्त होत असल्याने राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीतील हजारोंच्या संख्येने असलेल्या हरणांचा जीव कासावीस होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात विस्तीर्ण असे वनक्षेत्र अन्‌ त्यातील वन्यजीव हा निसर्गाचा मोठा अमुल्य ठेवाच लाभला आहे. तालुक्यातील जवळपास ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत येते.

त्यातील भुलेगाव, रहाडी, रेंडाळे, देवदरी, खरवंडी, ममदापूर, राजापूर, कोळगाव, सोमठाण जोश, पिंपळखुटे तिसरे, पिंपळखुटे बुद्रुक, तळवाडे, आहेरवाडी, जायदरे, कुसमाडी, नायगव्हाण, गोरखनगर, विसापूर, कातरणी या भागातील वनक्षेत्रात हरिण व काळविटांची संख्या जवळपास पाच ते सहा हजारांच्यावर आहेत.

याशिवाय ७० च्या आसपास नीलगाई, ३० च्या आसपास लांडगे व कोल्हे तसेच हजारो पशुपक्षी वास्तव्य करतात. हा भाग अवर्षणप्रवण असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात वन्यजीवांची अन्न पाण्याची हाल ठरलेली असते. यावर्षी पावसाने अवकृपा केल्याने जंगलात वन्यजीवांसाठी पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात विविध ठिकाणी ९ हजार लिटर्स क्षमतेचे एकूण २० वॉटर होल अर्थातच कृत्रिम पाणवठे तयार केलेले असून, हे पाणवठे हरीण, काळवीट आदी वन्यजीवांची तहान भागवत आहेत. राजापूर, ममदापूर, सोमठाण जोश, पिंपळखुटे तिसरे, रेंडाळे, देवदरी, कुसमाडी आदी भागात सध्या वॉटर हॉलमध्ये पाणी सोडले जात आहे.  (latest marathi news)

Water being pumped into water holes for deer in Rajapur area.
Nashik Water Crisis : पाण्याचे दुर्भिक्ष्य, उष्णतेमुळे फळबागा संकटात! डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात देवळ्यात मोठी घट

वडपाटीचा बंधारा कोरडा!

राजापूर भागातील शेती जंगलातील हरणे, झाडे-झुडपे व नर्सरीसाठी वर्षानुवर्षे आधार देणारा वडपाटी पाझर तलाव पावसामुळे यंदा भरला नव्हता. दरवर्षी हरणांची व वन्यजीवांची तहान भागविणारा व वनविभागाची नर्सरी फुलविणारा हा बंधारा मागील काही महिन्यांपासूनच कोरडाठाक पडल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनहद्दीत विविध विकासकामे देखील सुरू आहेत.

"परिसरातील सिमेंट बंधाऱ्यांसह इतर छोट्या-मोठ्या बंधाऱ्यात पाणी नसले तरी काही ठिकाणच्या उपलब्ध पाण्याचा वन्यजीवांना फायदा होत आहे. वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. सध्या गरजेनुसार ठीकठिकाणी पाणवठ्यात टँकरने पाणी टाकून वन्यजीवांची ताण भागवली जात आहे."

- गोपाळ राठोड, वनरक्षक, राजापूर

Water being pumped into water holes for deer in Rajapur area.
Nashik Water Crisis: निम्म्या देवळा तालुक्याची भिस्त टॅंकरवर! 24 गावे 37 वस्त्यांना तीस टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.