Nashik News : मालेगाव तालुक्यातील 21 गावांमधील टँकर झाले बंद

Nashik News : तालुक्यातील १० पैकी ९ मंडळांमध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिणामी काही ठिकाणी टँकर बंद झाले आहेत.
Tankers in 21 villages of Malegaon taluka were closed
Tankers in 21 villages of Malegaon taluka were closed esakal
Updated on

मालेगाव : तालुक्यातील १० पैकी ९ मंडळांमध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिणामी काही ठिकाणी टँकर बंद झाले आहेत. महिनाभरात २१ गावांमधील टँकर बंद झाल्याने प्रशासकीय व्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात अद्याप ३१ गावे व ७० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. (Tankers in 21 villages of Malegaon taluka were closed)

तालुक्यात सर्वत्र दोन-तीन मुसळधार पाऊस झाल्यानंतरच टँकरची संख्या घटू शकेल. सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. तालुक्यात गेल्या वर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती होती. अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी दिवाळी उलटताच अनेक गावांमध्ये टँकर धावत होत्या.

उन्हाळ्यात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. जवळपास निम्मा तालुक्याची तहान टँकरवर भागत होती. जूनमध्ये कुकाणे मंडळ वगळता इतर मंडलांनी जुनची पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे काही भागात पिण्याच्या पाण्यासंदर्भात नागरीकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात आजही ३१ गावे व ७० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

यासाठी ३३ टँकरच्या माध्यमातून ६५ फेऱ्या मारल्या जात आहेत. यंदा पावसाळा सुरु होताना ४९ गावे व ९८ वाड्यांना टँकर सुरु होते. तर ५५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे झाडी, अस्ताने, जळकू, टोकडे. (latest marathi news)

Tankers in 21 villages of Malegaon taluka were closed
Nashik Code Of Conduct : आचारसहिंता उठल्याने शासकीय कामांना वेग!

झोडगे, कुकाणे, निमशेवडी, काष्टी, अजंग, लखाणे, चिंचवे (गा.), डोंगराळे, वळवाडी, मांजरे, टिपे (लहान-मोठे), मोरदर, गारेगाव, करंजगव्हाण, रावळगाव, पोहाणे, गुगळवाड, वाके, कंधाणे ही गावे व त्याअंतर्गत येणाऱ्या वाड्या, वस्त्यांवरील टँकर बंद झाले आहेत.

सध्याची पाणी टंचाईची स्थिती

टंचाईग्रस्त गावे - ३१

टंचाईग्रस्त वाड्या - ७०

एकूण टँकर - ३३

एकूण फेऱ्या - ६५

गावांसाठी विहिरी अधिग्रहीत- ०७

टँकर भरण्यासाठी विहिरी अधिग्रहीत - २७

Tankers in 21 villages of Malegaon taluka were closed
Nashik ZP School : जुलै उजाडूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.