NMC Tax Recovery: कर सवलत योजना महापालिकेला पावली! 64 कोटींचा भरणा; 6 टक्के मालमत्ताधारकांना योजनेचा लाभ

Nashik News : महापालिकेला जीएसटी माध्यमातून उत्पन्न मिळते. त्या पाठोपाठ मालमत्ता करातून उत्पन्न मिळते
NMC News
NMC Newsesakal
Updated on

NMC Tax Recovery : महापालिकेचे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच मालमत्ता कराचे उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करण्याच्या उद्देशाने विविध विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या तर सवलत योजनेत पहिल्या महिन्यात महापालिकेच्या तिजोरी ६४ कोटी ३९ लाख ४८ हजार रुपयांचा कर जमा झाला आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महापालिकेसाठी ही मोठी उपलब्ध असून जवळपास सहा टक्के मालमत्ता धारकांनी कर जमा करत योजनेचा लाभ घेतला आहे. (Nashik Tax relief scheme for NMC news)

महापालिकेला जीएसटी माध्यमातून उत्पन्न मिळते. त्या पाठोपाठ मालमत्ता करातून उत्पन्न मिळते. मालमत्ता कर अधिक वसूल होण्यासाठी २०१६ पासून महापालिकेकडून कर सवलत योजना लागू करण्यात आली आहे. योजना आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात एक रक्कम संपूर्ण घरपट्टी अदा केल्यास मिळकत धारकांना आठ टक्के सवलत दिली जाते.

ऑनलाइन कर अदा केल्यास दोन टक्के सूट आहे. मे महिन्यात पाच टक्के व जून महिन्यात तीन टक्के याप्रमाणे सवलत आहे. कर योजनेमध्ये एप्रिल महिन्यात करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ६४ कोटी ३९ लाख ४८ हजार रुपये कर जमा झाला आहे.

५७ हजार करदात्यांनी योजनेचा लाभ घेतला. पश्चिम विभागातून सर्वाधिक १४ कोटी ६४ लाख रुपये मालमत्ता कर जमा झाला. मागील वर्षी ९० कोटी रुपयांचा भरणा झाला होता. पश्चिम विभाग पाठोपाठ पूर्व विभागात २७००० मिळकतधारकांनी नऊ कोटी ९१ लाख २६ हजार रुपये कर जमा केला आहे. (Latest Marathi News)

NMC News
Nashik NMC News : एकीकडे निवडणुका, दुसरीकडे खोदकाम; वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा देण्यासाठी 15 मे ‘डेडलाईन’

मे व जून या दोन महिन्यात मिळकत धारकांनी कर भरून अधिकाधिक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर विभागाचे प्रभारी उपायुक्त विवेक भदाणे यांनी केले आहे. मागील वर्षी आर्थिक वर्षात २०० कोटींच्या घरपट्टीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जवळपास १९७ कोटी रुपये वसुल झाले.

विभागनिहाय कर संकलन

- पश्चिम- १४ कोटी ६४ लाख ११ हजार ७४३

- सिडको- ११ कोटी ६८ लाख ८९ हजार ७५०

- पंचवटी- ११ कोटी ३० लाख ८६ हजार ४५४

- पूर्व- ९ कोटी ९१ लाख २६ हजार ९१६

- नाशिक रोड- ८ कोटी ९५ लाख ९८ हजार ४२२

- सातपूर- ७ कोटी ८८ लाख ३४ हजार ७७८

NMC News
Nashik NMC News : मनपाची ऑनलाइन सेवा विस्कळित! 8 तासानंतरही सर्व्हर डाऊन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.