Nashik Teacher Constituency: शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत 69 हजार मतदार बजावणार हक्क

Teacher Constituency : शिक्षकांना ‘गिफ्ट’ वाटपामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २५) पाच जिल्ह्यांत मतदान होणार आहे.
Teacher Constituency
Teacher ConstituencySakal
Updated on

Nashik Teacher Constituency : शिक्षकांना ‘गिफ्ट’ वाटपामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २५) पाच जिल्ह्यांत मतदान होणार आहे. निवडणुकीत एकूण २१ उमेदवार रिंगणात असले, तरी चौरंगी लढत रंगताना दिसते. यात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. ( 69 thousand voters will exercise their rights in 5 districts of Nashik Division )

शिक्षक मतदारसंघात नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथे सुमारे ६९ हजारांवर मतदार आहेत. मतदान केंद्राच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रासाठी सहा कर्मचारी नियुक्त केले जातील. त्यात एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई असे सहा कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहेत. त्यासाठी १७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. (latest marathi news)

Teacher Constituency
Nashik Teacher Constituency Election : अजित पवार यांचा एक पक्ष अन चार तऱ्हा

या बरोबरच बंदोबस्तासाठी फ्लाइंग स्कॉड राहणार आहे. त्यात दोन पोलिस कर्मचारी, व्हिडिओ पाहणी पथक- एक, भरारी पथक- एक, व्हिडिओ निरीक्षक- एक असे पाच जणांचे पथक राहील. जिल्हा प्रशासन या नियोजनावर अखेरचा हात फिरविताना व्यस्त दिसून येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक, त्याच्या वाहनांची व्यवस्था व सदर नियोजनही गतिमान झाले. धुळे, जळगाव येथील मतदारांची संख्या पाहता चौरंगी लढतीची चिन्हे जास्त आहेत.

रिंगणातील उमेदवार...

किशोर दराडे (शिवसेना), ॲड. संदीप गुळवे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), ॲड. महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस), विवेक कोल्हे (अपक्ष), भागवत गायकवाड (समता पक्ष), अनिल तेजा, अमृतराव शिंदे, इरफान नादिर, भाऊसाहेब कचरे, सागर कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, डॉ. छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, संतोष गुळवे (अपक्ष).

Teacher Constituency
Nashik Teacher Constituency Election : स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारास प्राधान्य : विवेक कोल्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.