Nashik Teacher Constituency Election : नाशिक जिल्ह्यात 92 टक्के मतदान! पेठ तालुक्यात सर्वाधिक मतदानाची नोंद

Nashik News : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागात सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक जिल्ह्यात एकूण ९१.६३ टक्के मतदान झाले आहे.
Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Election esakal
Updated on

Nashik News : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागात सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक जिल्ह्यात एकूण ९१.६३ टक्के मतदान झाले आहे. पेठ तालुक्यात मतदारांची संख्या कमी असल्यामुळे येथे सर्वाधिक ९९.१९ टक्के मतदान झाले. मालेगाव शहरात ८४.७९ टक्के इतके सर्वांत कमी मतदान झाल्याची नोंद आहे. (Teacher Constituency Election 92 percent voting in district)

नाशिक जिल्ह्यातील एकूण २५ हजार ३०२ मतदारांसाठी २९ केंद्र निर्माण करण्यात आले. बुधवारी (ता. २६) सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केलेली होती. मतदानासाठी आलेल्या शिक्षकांना मतदान चिठ्ठीचे वाटप करून त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात आले.

मतपत्रिकेवर एकूण २१ उमेदवारांची नावे असल्यामुळे मतदानास विलंब झाल्याचे मतदारांनी सांगितले. तर संथगतीने मतदानाची प्रक्रिया पार पडल्यामुळे मतदान केंद्रांबाहेर दिवसभर रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर दिसून आले. जिल्ह्यातील सर्व २९ केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन व्यवस्था केलेली होती.

मतदान केंद्रातील सीसीटीव्हीद्वारे कंट्रोल ठेवत प्रशासनाने प्रक्रिया हाताळली. किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. महाविकास आघाडी, महायुतीच्या नेत्यांसह अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींनीही मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. (latest marathi news)

Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 93.48 टक्के मतदान

जिल्ह्यात केंद्रनिहाय झालेले मतदान

सुरगाणा - ९५.३१ टक्के

कळवण - ९४.६७ टक्के

देवळा - ९६.८३ टक्के

बागलाण - ९६.३९ टक्के

बागलाण २ - ९५.०१ टक्के

मालेगाव शहर - ८४.७९ टक्के

मालेगाव तहसील - ९६.१६ टक्के

मालेगाव तहसील २ - ८७.६६ टक्के

नांदगाव - ९२.५२ टक्के

येवला - ९५.०७ टक्के

येवला २ - ९०.९१ टक्के

चांदवड - ९३.७० टक्के

निफाड - ९४.४० टक्के

निफाड २ - ९०.२८ टक्के

दिंडोरी - ९२.८६ टक्के

पेठ - ९९.१९ टक्के

बी. डी. भालेकर - ९२.९२ टक्के

बी. डी. भालेकर २ - ९२.५३ टक्के

बी. डी. भालेकर ३ - ८३.३८ टक्के

मखमलाबाद - ९२.०६ टक्के

मखमलाबाद २ - ९२.६५ टक्के

मखमलाबाद ३ - ९२.६८ टक्के

मखमलाबाद ४ - ९२.५९ टक्के

रमाबाई आंबेडकर - ८६.४७ टक्के

रमाबाई आंबेडकर २ - ८४.७१ टक्के

रमाबाई आंबेडकर ३ - ८१.७९ टक्के

त्र्यंबकेश्‍वर - ९४.६८ टक्के

इगतपुरी - ९४.१३ टक्के

सिन्नर - ९४.६१ टक्के

एकूण - ९१.६३ टक्के

Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक शहरात 10 केंद्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.