Nashik Teacher Constituency Election : अजित पवार यांचा एक पक्ष अन चार तऱ्हा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महेंद्र भावसार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला. या उमेदवारीवरून शिवसेनेतच मतमतांतरे दिसत आहेत.
Teachers Constituency Election
Teachers Constituency Electionesakal
Updated on

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेने विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महेंद्र भावसार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला. या उमेदवारीवरून शिवसेनेतच मतमतांतरे दिसत आहेत. (Nashik Teacher Constituency Election)

भावसार हे आमचे उमेदवार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ सांगत आहेत; तर आमदार अॅड. माणिकराव कोकाटे ‘कोण भावसार?’ असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. यापुढेही जाऊन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे यांनाच पाठिंबा देऊन टाकला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चाललेय तरी काय, असा सवाल उपस्थित होतो. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतर्फे किशोर दराडे हे उमेदवारी करीत असून, त्यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली. बैठकीस घटक पक्ष असलेल्या ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली होती.

भुजबळ जिल्ह्यात असूनही ते बैठकीला हजर न राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कोकाटे, आमदार सरोज अहिरे या बैठकीला उपस्थित होते. (latest marathi news)

Teachers Constituency Election
Nashik News : अंधश्रध्देविरोधात पंचवटीत प्रबोधन मोहीम; भोंदूगिरी शून्यावर पोलिस - अंनिसचा उपक्रम

ही संभ्रमावस्था असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये येत शिक्षक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पक्षाने उमेदवार उतविल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून महायुतीच्या उमेदवारीवरून परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त करीत असल्याने संभ्रम वाढला आहे.

"‘वड्याचे तेल वांग्यावर’ असे सध्या सुरू आहे. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नसते. काही बैठकींना आमचे पदाधिकारी जातात. निवडणुकीत प्रत्येक जण उमेदवारीसाठी प्रयत्न करतो. आमच्या पक्षातर्फे धुळ्याचे महेंद्र भावसार म्हणून उमेदवार आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पाहू पुढे कसे होते?" - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

"मला कुठलाही निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून निरोप आल्याने मी या बैठकीस उपस्थित राहिलो. महायुतीकडून दराडे यांना उमेदवारी देण्यात आली असेल, तर त्यांचा प्रचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला असेल, तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसने भावसार यांना एबी फॉर्म दिला आहे, ते कोण आहेत, आमच्या पक्षाचा उमेदवार असेल तर आम्ही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार. आम्हाला अजितदादांनी आदेश दिला, तर ते जे सांगतील तेच काम करणार." - अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर मतदारसंघ

"महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे आणि आमच्या कुटुंबीयांचे जुने संबंध आहेत. गुळवे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देत आहे." - नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष

Teachers Constituency Election
Nashik News : अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात प्रत्येक प्रदोषला भरते यात्रा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.