Nashik Teacher Constituency Election : बोगस मतदार सिद्ध झाल्यास मुख्याध्यापकावरच कारवाई

Nashik News : बोगस मतदाराविषयी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यास मुख्याध्यापकाने दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी केली जाईल.
Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Election esakal
Updated on

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बुधवारी (ता. २६) होत असून, बोगस मतदाराविषयी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यास मुख्याध्यापकाने दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी केली जाईल. संबंधित मतदार शाळेत काम करत नसेल आणि तरीही मुख्याध्यापकांनी मतदार नोंदणीवेळी प्रमाणपत्र दिले असल्यास त्या मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (Nashik Teacher Constituency Election)

असे नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या ५४ तालुक्यांतील मतदार यासाठी मतदान करतील. यामध्ये बोगस मतदार नोंदणीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

मतदार नोंदणी प्रक्रियेवेळी शिक्षकांनी शाळेत कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र मतदार नोंदणी अर्जासोबत जोडले आहे. मात्र अनेक ठिकाणी बोगस मतदार नोंदवले गेल्याची चर्चा आहे. काही उमेदवारांनी बोगस मतदार नोंदणी संदर्भात तक्रारी केल्या आहेत. (latest marathi news)

Nashik Teacher Constituency Election
Nashik Division Teachers Constituency Election : मतदानासाठी ओळखपत्राचे 10 पुरावे ग्राह्य : जिल्हाधिकारी गोयल

अशावेळी बोगस मतदार असल्याची तक्रार आल्यास त्याची पूर्ण चौकशी होऊन बोगस मतदार असल्यास ज्या शाळेने अथवा मुख्याध्यापकाने शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र दिले असेल अशा मुख्याध्यापकावरच महसूल विभाग कारवाई करेल, असे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले आहे.

"बोगस मतदारासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही थेट मतदार नोंदणी करताना जमा केलेले कागदपत्र तपासून यामध्ये मुख्याध्यापकाने दिलेले प्रमाणपत्र बोगस आढळल्यास मुख्याध्यापकावरच कारवाई करू." - प्रवीण गेडाम, विभागीय महसूल आयुक्त

Nashik Teacher Constituency Election
Nashik Division Teachers Constituency Election: शिक्षक, शिक्षण अन शिक्षणसंस्थांना न्याय देणार : ॲड. संदीप गोपाळराव गुळवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.