Nashik Teacher Constituency : निष्क्रियता सांगणाऱ्या कोल्हेंनी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये : प्रा. रवींद्र मोरे

Nashik News : शिक्षकांना सभ्य आणि सुसंस्कृत प्रतिनिधी अपेक्षित असल्याने महाविकास आघाडीने ॲड. गुळवे या उच्चशिक्षित उमेदवारास मैदानात उतरविले आहे.
Prof. Ravindra More, C. D. Shinde, Sandeep Gulve
Prof. Ravindra More, C. D. Shinde, Sandeep Gulveesakal
Updated on

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सक्षम लोकप्रतिनिधी देण्याची असल्याने दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्यात माहीर असलेल्या विवेक कोल्हे यांनी अविवेकी बाणा न दाखविता अभ्यासू धोरणावर समोर बोलावे. (Teacher Constituency Prof Ravindra More Criticize Vivek Kolhe)

तसेच टीडीएफ व इतर शिक्षक संघटनांनी विचारविनिमय करून मूळ प्रश्नांची जाण असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांना पाठिंबा दिला असल्याने नीतिमूल्यांच्या गप्पा मारणाऱ्या उमेदवाराने अपक्ष उभे राहून करीत असलेली कोल्हेकुई, मत खाण्याचे मनसुबे, खोटे सामाजिक धोरण, नीतिभ्रष्टपणा एकत्र करून आपल्याच गावच्या वेशीला स्वतःच्या हाताने टांगून द्यावा, असा टोला ‘टीडीफ’चे जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे यांनी लगावला.

शिक्षकांना सभ्य आणि सुसंस्कृत प्रतिनिधी अपेक्षित असल्याने महाविकास आघाडीने ॲड. गुळवे या उच्चशिक्षित उमेदवारास मैदानात उतरविले आहे. गुळवे हे विजयासमीप असल्याने सामाजिक समतोलतेचा आव आणून खचलेल्या मानसिकतेतून कोल्हे यांनी नंदू नावाच्या अभ्यासकांना बंधू करून टाकले. विवेक कोल्हे यांनी दुसऱ्याच्या मुखात असभ्य भाषा टाकून त्यांच्यातलाच बोलघेवडेपणा सिद्ध करून दिला आहे.

लोकशाहीने प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार दिला, तसा उघड बोलण्याचा अधिकारही दिल्याने तथ्य नसलेल्या बाबींवर विरोध करणाऱ्यांनी स्वतः समोर येऊन बोलावे, असेही मोरे यांनी सांगत पाचही जिल्ह्यांत लोकसभेसारखाच निकाल ‘शिक्षक’मध्ये लागणार असून, गुळवे यांचा विजय कुणीही रोखू शकत नाही, असेही सांगितले. पक्षीय निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. ॲड. गुळवे यांच्यातील सामाजिक अस्मिता वाखाणण्याजोगी असून, त्यांना ‘मविप्र’च्या निवडणुकीत मिळालेले मताधिक्य याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे. (latest marathi news)

Prof. Ravindra More, C. D. Shinde, Sandeep Gulve
ZP Teacher Recruitment : चाळीसगाव तालुक्यात शिक्षकांची 38 पदे रिक्त; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण

कोल्हेंची काँग्रेस स्थावर, तर भाजप जंगम मालमत्ता

मोठी राजकीय हयात काँग्रेसमध्ये घालविलेले कोल्हे घराणे आता भारतीय जनता पक्षात आहे. विवेक कोल्हे यांचे मूळ संस्कारी विचार काँग्रेसचे असल्याने तेथे त्यांना खरी स्थावरता पक्षामुळे मिळाली; परंतु अचानक ते भाजपमध्ये गेल्याने पक्षीय निष्ठा हा शब्द त्यांच्या मुखातून शोभत नाही. सध्या ते ज्या पक्षात आहेत, तेथे त्यांचा जंगमपणा टिकून आहे.

मुळात त्यांनी युती धर्म पाळायला पाहिजे होता; पण ‘दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान...’ अशी अवस्था सध्या त्यांची आहे. भाजपने युती करून उमेदवार दिला असताना त्यांनी मोडलेल्या पक्ष शिस्तीबाबत राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घ्यावी, असा टोला प्रा. मोरे यांनी लगावला आहे.

"शिक्षक चळवळीतील पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि शिक्षकांचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविण्यासाठी ॲड. संदीप गुळवे हे सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत. सर्व प्रमुख शिक्षकांच्या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून ॲड. गुळवे आपल्या भूमिकेला योग्य न्याय देतील. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी त्यांना मतदान करून एक अभ्यासू प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे."- सी. डी. शिंदे, सेवक संचालक, ‘मविप्र’, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.