Nashik Teacher Transfer : जिल्ह्यांतर्गत बदलीने नाशिक जिल्ह्यात बदली होऊन आलेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेचा मार्ग खुला झाला आहे. पाच महिन्यांपासून या शिक्षकांना पदस्थापना मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या ७२ शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर धडक मारत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांची भेट घेतली. डॉ. गुंडे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून पदस्थापना देण्याचे निर्देश दिले. ( Teacher Transfer Posting within district on 5 August )
त्यानुसार ५ ऑगस्टला समुपदेशन पद्धतीने शिक्षकांना पदस्थापना दिली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. आंतरजिल्हा बदलीतून जिल्ह्यात ८० शिक्षक मिळाले. जिल्ह्यात आलेल्या या शिक्षकांना तत्काळ पदस्थापना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, यातील आठ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली अन् लगेच आचारसंहिता लागू झाली. मात्र, ५ जुलैला ती संपुष्टात आल्यानंतरही पदस्थापनेबाबत कार्यवाही झालेली नाही.
या शिक्षकांना तोंडी आदेशाने शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने शिक्षक दिलेल्या शाळांमध्ये रुजू होत काम करत आहे. परंतु, शाळेनुसार पदस्थापना नसल्याने या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. पदस्थापना नसल्याने वेतन मिळत नसल्याचे वास्तव ‘सकाळ’ने मांडले होते. त्यानंतर लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु विभागाकडून कोणताही हालचाल नसल्याने संतप्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर धडक मारली. (latest marathi news)
शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांची भेट घेतली. शिक्षकांनी वेतन रखडल्याने गृह कर्जाचे हप्ते गेलेले नाहीत. हप्ते जात नसल्याने दंड बसत आहे. शिवाय सिबिल डाउन होत आहे, त्यामुळे पुढील कर्जांना अडचणी येत आहेत. शाळेचे गाव न मिळाल्यामुळे शिक्षकांना राहण्याचे नियोजन करता येत नाही, ते नसल्याने मुलांचे शाळाप्रवेश होऊ शकलेले नसल्याचे सांगितले. त्यावर डॉ. गुंडे यांनी शिक्षण विभागास तत्काळ पदस्थापना देण्याचे निर्देश दिले.
''शिक्षक बदल्या, पदोन्नत्या करावयाचे असल्याने आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना दिली जात नव्हती. मात्र, आता या शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांचे रखडलेले वेतनही अदा केले जाईल.''- डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.