Nashik Teachers Constituency Election : विधान परिषदेसाठी जिल्ह्यात 29 मतदान केंद्रे; नाशिकमध्ये सर्वाधिक 10 केंद्रे

Teachers Constituency Election : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात २९ मतदान केंद्रे निश्‍चित झाले आहेत.
Teacher Constituency Election
Teacher Constituency Electionesakal
Updated on

Nashik Teachers Constituency Election : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात २९ मतदान केंद्रे निश्‍चित झाले आहेत. नाशिक शहरात सर्वाधिक दहा केंद्रे असतील. मतदान केंद्राध्यक्षांसह सूक्ष्म निरीक्षक, सहाय्यक, फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २९० कर्मचाऱ्यांची या निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आली. ( 29 polling stations in district for Vidhan Parishad )

नाशिक विभागात एकूण ६४ हजार ८०२ मतदारांची नावे निश्‍चित झाली असून, अंतिम टप्प्यात नोंदविण्यात आलेले पाच हजार ५३९ मतदारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. सोमवारी (ता. १०) उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि बुधवार (ता. १२)पर्यंत अर्ज मागे घेता येतील. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतात. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार आपल्या जिल्ह्यातील कसे राहतील, याकडे उमेदवारांचा कल असतो.

नाशिक जिल्ह्यात २३ हजार ५९७ मतदारांची नावे अंतिम झाली आहेत. धुळ्यात आठ हजार ८८ अंतिम मतदार आहेत. जळगावमध्ये १३ हजार ५६ शिक्षकांची नावे अंतिम मतदारयादीत प्रसिद्ध झाली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार ४१९ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यात असल्याने सर्वाधिक उमेदवारही याच जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यात १४ हजार ६९२ मतदारांचे नाव यादीत समाविष्ट झाले. साधारणत: एक हजार मतदारांना मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (latest marathi news)

Teacher Constituency Election
Nashik Teachers Constituency Election : माघार घेण्यासाठी महसूल कार्यालयात वाढली गर्दी!

जिल्ह्यात २९ मतदान केंद्रांपैकी नाशिक शहरात सर्वाधिक १० केंद्रे आहेत. मालेगाव शहरात एक व ग्रामीणमध्ये दोन अशी एकूण तीन केंद्रे आहेत. त्यापाठोपाठ बागलाण, येवला, निफाड या ठिकाणी प्रत्येकी दोन केंद्रे आहेत. उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी एक मतदान केंद्राचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मतदान हे बॅलेट पेपरवर होणार असल्याने येथे उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवायचा आहे. त्यामुळे नामसाधर्म्याचा उमेदवारांना कितपत फायदा होतो, याविषयी साशंकता आहे.

केंद्रावर असा असेल बंदोबस्त

प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसह दोन सहाय्यक मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई असे पाच कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामकाज सांभाळतील. याव्यतिरिक्त फिरत्या पथकात एक व्हिडिओ ग्राफर, व्हिडिओ निरीक्षक व दोन पोलिसांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या

जिल्हा.......२०२४..........प्रलंबित अर्ज

नाशिक......२३,५९७.........२,१८३

धुळे.........८,०८८..............८०

जळगाव.....१३,०५६...........५८

नंदुरबार......५,४१९.............१०३

अहमदनगर..१४,६९२..........३,११५

एकूण........६४,८०२...........५,५३९

Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Election : ‘महाविकास’तर्फे गुळवेंचे नाव जवळपास निश्चित; उद्या उमेदवारीची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.