Nashik News : जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांचे उर्वरित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावू. आपण जे बोलतो, ते करून दाखवितो, हे माझ्या आजवरच्या वाटचालीचे वैशिष्ट्य आहे. शिक्षकांची बाजू विधान परिषदेत प्रभावीपणे मांडू. आजवर या मतदारसंघात शिक्षकांचा झालेला भ्रमनिरास आपण दूर करू. (Nashik Teachers Constituency Election)
हेतू प्रामाणिक असेल, तर परिवर्तन अटळ असते, हा संदेश देणारी ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन शिक्षक मतदारांबरोबर संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.
प्रश्न सोडविण्यासाठी संधी म्हणून आपण या निवडणुकीकडे पाहतो. विद्यमान आमदारांकडून भ्रमनिरास झाल्याने शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मला या निवडणुकीत उतरण्याचा आग्रह केला. विद्यमान आमदारांनी फार थोडे प्रश्न शिक्षण क्षेत्राबाबत विचारले. त्यामुळे शिक्षकांचा त्यांच्यावर रोष आहे. (latest marathi news)
‘विवेकनामा’ या नावाने आपण आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून या निवडणुकीत उतरलो आहोत. मतदार सुजाण आणि जागरूक आहेत. आपले प्रश्न कोण सोडवू शकतो, याची त्यांना जाणीव आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा आणि त्यात काही तरी चांगले करून दाखविण्याची परंपरा आमच्या कुटुंबाकडे आहे.
माझे आजोबा माजी मंत्री (कै.) शंकरराव कोल्हे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी योगदान दिले. संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून एका अर्थाने शैक्षणिक क्रांती केली. हा वारसा घेऊन मी वाटचाल करीत आहेत. ही लढाई तत्त्वाची आणि गुणवत्तेचीही आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ‘टीडीएफ’चे अध्यक्ष मधुकर पवार यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.