Nashik Teachers Constituency Elections : ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल; चर्चांना उधाण

पाटील यांना ठाकरेंनी शब्द दिलेला नसल्याचा दावा अॅड. सुभाष जंगले यांनी केला आहे.
Shubhangi Patil
Shubhangi Patil Sakal
Updated on

Nashik Teachers Constituency Elections : नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या सकाळपासून नॉटरिचेबल झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Shubhangi Patil
Teachers Constituency Election : नाशिकनंतर नागपूरमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीकडून अर्ज मागे

पाटील अचानक नॉटरिचेबल झाल्याने अनेक राजकीय तर्कवितर्कांना अधाण आले आहे. पाटील नॉट रिचेबल असल्याने आता नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पाटील यांना ठाकरेंनी शब्द दिलेला नसून, आपणच मविआचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा अॅड. सुभाष जंगले यांनी केला आहे.

Shubhangi Patil
Nepal Plane Crash : ब्लॅक बॉक्स सापडला; भीषण विमान अपघातातचं रहस्य येणार समोर

सत्यजीत तांबेंची धडधड वाढवणाऱ्या शुभांगी पाटील कोण?

सत्यजीत तांबेंच्या अपक्ष उमेदवारीनंतर आता ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

कोण आहेत शुभांगी पाटील?

  • शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.

  • त्या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

  • या शिवाय त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.

Shubhangi Patil
ShareChat Layoffs : मंदीचे मळभ अधिक गडद! लोकप्रिय भारतीय कंपनीकडून 500 कर्मचाऱ्यांना नारळ
  • तसेच पाटील या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत.

  • नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत.

  • याशिवा शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.