Nashik News : शहरांमध्ये डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्रीय पथकानंतर महापालिका प्रशासनाने वाढत्या रुग्णसंखेच्या अनुषंगाने १ लाख घरांना भेटी देऊन डेंगी निर्मूलनाचे कार्य हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी २०० कंत्राटी कर्मचारी २०० आशा वर्कर्स असे प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचे एक पथक व त्या व्यतिरिक्त ५० मलेरिया विभागाचे स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत डेंगी निर्मूलन मोहीम हाती घेतली जाणार आहे.(Dengue Update)
शहरामध्ये डेंगीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मे महिन्यात ३३ रुग्ण होते. त्यानंतर जून महिन्यात प्रादुर्भाव वाढून १५५ डेंगी बाधितांचा आकडा झाला. डेंगीचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन केंद्रीय पथकाने नाशिकमध्ये भेट देऊन पाहणी केली. महापालिकेचे कान टोचल्यानंतरदेखील प्रशासन हालले नाही.
मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३०८ डेंगीच्या संशयित रुग्णांपैकी ९६ बाधित असल्याचे आढळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्याअनुषंगाने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी डेंगी निर्मूलनासाठी विशेष बैठक बोलावत १५ दिवसात कृती कार्यक्रम आखला. यामध्ये महापालिकेचे २०० कंत्राटी कर्मचारी व २०० आशा वर्कर्स दोन्ही मिळून ४०० कर्मचारी डेंगी निर्मूलनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
मलेरिया विभागाचे फसवे आकडे
मलेरिया विभागाकडून दररोज घरोघरी भेटी दिल्या जातात. त्या भेटीचे आकडे व कर्मचाऱ्यांची उपलब्ध संख्या लक्षात घेता आकडे फसवे असल्याचे लक्षात येते. दररोज दहा ते बारा हजार घरांना भेटी दिल्याचे कागदपत्रे दिसते, मात्र प्रत्यक्षात काहीच काम झालेले नसते. त्याअनुषंगाने आता घरोघरी भेट दिली जाणार आहे. एक कंत्राटी कर्मचारी व एक आशा वर्कर असे दोन जणांचे पथक असेल. (latest marathi news)
या पथकाला घरामधील डेंगी उत्पत्तीची स्थळे, पाण्याची डबक्यांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले जाणार आहे. शहरात दररोज ६ हजार घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. कंत्राटी कर्मचारी व आशा वर्कर्स मार्फत डेंगी ब्लॅक स्पॉटचा शोध घेत असताना दुसरीकडे मलेरिया विभागाचे ५० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक शहरातील सहा विभागांमध्ये पाठविले जाणार आहे. एकूण ३६५ बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग केले जाणार आहे.
विभागीय अधिकाऱ्यांचाही समावेश
डेंगीचे स्पॉट असलेल्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या दरम्यान कारवाई केली जाणार आहे. बांधकामाचे मोठे प्रकल्प, तळघर, रस्त्यांवर पडलेले खड्डे, डास उत्पत्ती स्थळे आदींची पाहणी केली जाणार आहे. विभागीय अधिकाऱ्यांबरोबरच वैद्यकीय अधिकारीदेखील मोहिमेत सहभागी होणार आहे.
औषध व धूर फवारणीची बोंब
साधारणतः पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात डेंगीचा उद्रेक होतो, मात्र शहर व परिसरामध्ये दमदार पाऊस होत नाही. पावसाची रिमझिम होत असल्याने अडगळीच्या ठिकाणी डबके तयार होऊन डेंगीच्या अळी तयार होत आहे. मात्र असे असले तरी महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून नियमितपणे औषध व धूर फवारणी होत असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने धूर फवारणी प्रत्यक्षात होते की कागदावर याचीदेखील तपासणी केली जाणार आहे.
"डेंगी निर्मूलनाची जबाबदारी महापालिकेच्या बरोबरच नागरिकांचीदेखील आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत डेंगी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनीदेखील सहकार्य करावे." -स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.