मनमाड : येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रं ६ वर मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस छत्रपती संभाजी नगरकडे निघाली असतानाच दोन प्रवासी महिला बाळासोबत धावत्या गाडीमध्ये चढत असतानाच त्यांचा तोल जावू लागल्याने फलाटावर तैनात लोहमार्ग पोलिसांच्या पथकाचे क्षणाचाही विलंब न लावता त्यांचे प्राण वाचवले. (team of Lohmarg Police deployed saved life of woman passenger with her baby)
खाली पडणाऱ्या बाळाला व महिला प्रवाशांना अक्षरशः गाडी खालून ओढून बाहेर काढल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ६ वर ही घटना घडली. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस फलाटावरून छत्रपती संभाजी नगरकडे निघाली असताना चार वर्षाचे बाळ घेऊन दोन प्रवासी महिला चालत्या गाडीमध्ये चढत होत्या.
मात्र, गाडी धावू लागल्याने त्यांचा जीव धोक्यात आला. ही परिस्थिती पाहून दासरे व वाघ यांनी क्षणार्धात धाव घेऊन जागरूकता व समयसुचकतेने बोगीच्या दरवाज्यातून गाडीखाली जात असलेल्या बाळाला व महिला प्रवाशांना ओढून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. (latest marathi news)
शकील अहमद, जमील अहमद, आफिया फिरदोस शकील अहमद, शकीला बानो मोहम्मद हसीम अशी या प्रवाशांची नावे आहेत. गाडी थांबल्यानंतर या प्रवाशांना सुखरूप मार्गस्थ करण्यात आले. पोलिस कर्मचारी दासरे व वाघ यांनी दाखविलेल्या समय सुचकतेबद्दल लोहमार्ग पोलिस अधिक्षक स्वाती भोर.
उपविभागीय पोलिस अधिकारी मारूती पंडीत यांनी त्यांचे अभिनंदन केले. मनमाड लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दासरे व पोलिस कॉन्स्टेबल वाघ यांनी हे काम फत्ते केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.