Nashik News : अमली पदार्थविरोधात आता ‘टास्क फोर्स’; नियंत्रणासाठी राज्यभर नोडल अधिकाऱ्यांची टीम करणार काम

Nashik : राज्यात दिवसेंदिवस अमली पदार्थ आढळून येत असून, मोठ्या प्रमाणात रॅकेट पसरलेले आहे.
drugs
drugsesakal
Updated on

Nashik News : राज्यात दिवसेंदिवस अमली पदार्थ आढळून येत असून, मोठ्या प्रमाणात रॅकेट पसरलेले आहे. अमली पदार्थांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांच्या देखरेखीखाली ‘टास्क फोर्स’ सुरू केला आहे. पोलिस आयुक्तालयांमध्ये गुन्हे शाखांचे उपायुक्त तर, जिल्हा अधीक्षकांच्या स्थानिक गुन्हे शाखांचे वरिष्ठ अधिकारी या फोर्सचे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. (team of nodal officers will work across state to control Task Force against drugs )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.