Haribhau Shinde : ‘घाबरू नको बाळा, मतदान होईपर्यंत मला काहीच होणार नाही’; आईच्या निधनानंतर 24 तासांत नायब तहसीलदार पुन्हा कर्तव्यावर

Haribhau Shinde dedication to work : ‘घाबरू नको बाळा, तुझे मतदानाचे काम होईपर्यंत माझ्या तब्येतीला काहीच होणार नाही’, असा धीर देणारी आई एकाएकी सोडून गेल्यावर मुलाचा जीव कासावीस झाला.
Haribhau Shinde
Haribhau Shindeesakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘घाबरू नको बाळा, तुझे मतदानाचे काम होईपर्यंत माझ्या तब्येतीला काहीच होणार नाही’, असा धीर देणारी आई एकाएकी सोडून गेल्यावर मुलाचा जीव कासावीस झाला. आपण निवडणुकीच्या कर्तव्यात व्यग्र राहिलो; पण आई सोडून गेली. दु:खाचा डोंगरच कोसळला.

तिचे अंत्यदर्शन घेत अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी गोदामाईच्या कुशीत अस्थी विसर्जित करून पुन्हा निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर झाले. ही हृदयद्रावक कथा आहे, नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील नायब तहसीलदार हरिभाऊ शिंदे यांची.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.