Nashik Tehsildar Bahiram Bribe Case : गौण खनिजाच्या प्रकरणात पंधरा लाखांची लाच स्वीकारताना पकडलेला नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
त्यांच्या मालमत्तेसह इतरही प्रकरणांचा शोध घेतला जाणार आहे. (Nashik Tehsildar Bahiram Bribe Case Motion for suspension of bribery Bahiram submitted news)
दुसऱ्या बाजूने महसुली चौकशीही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. लाचखोर अधिकाऱ्याला अॅन्टिकरप्शनने पकडल्यानंतर त्यांच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत देखील त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, बहिरम यांच्यावरील कारवाईमुळे सध्या कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी तात्पुरता पदभार संजय गांधीच्या तहसीलदार रचना पवार यांच्याकडे सोपविल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्पष्ट केले. लाचखोर बहिरम यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिंडोरीच्या प्रांताधिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पुरवठा विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही पकडण्यात आले आहे. या सर्वच गंभीर बाबी लक्षात घेता जिल्हाधिकारी शर्मा यांनी उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.
ही समिती या प्रकरणातील तथ्य तपासणार आहे. तसेच अजूनही काही प्रलंबित असलेली प्रकरणे किंवा इतर बाबींची तपासणी करून बहिरम यांच्या कामकाजाचा हेतू नेमका कसा होता, हे तपासणार असल्याचेही शर्मा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.