Nashik Tejas Garge Bribe Case : लाचखोर डॉ. गर्गेच्या घराची झडती! सापडले फक्त 3 लाख; 20 लाख बँकेत

Crime News : लाचप्रकरणी गुन्ह्यात पसार असलेले पुरातत्त्व व वस्तु संग्रहालयाचे तत्कालिन संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली
Dr. Tejas Garge Bribe Crime
Dr. Tejas Garge Bribe Crimeesakal
Updated on

Nashik Tejas Garge Bribe Case : पुरातत्त्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाखांच्या लाचप्रकरणी गुन्ह्यात पसार असलेले पुरातत्त्व व वस्तु संग्रहालयाचे तत्कालिन संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली. यात त्यांच्या बँक खात्यावर २० लाख, घरात तीन लाख १८ हजार रुपये, तीन टीबीच्या हार्डडिक्स आणि गर्गे दाम्पत्याचे पासपोर्ट ‘लाचलुचपत’च्या हाती लागले आहे. (Nashik Dr Tejas Garge Bribe Case)

रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी उद्योजकाला कंपनी सुरू करायची होती. त्यासाठी त्यास पुरातत्त्व विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र या विभागाकडे मागितले होते. ७ मे रोजी नाशिकच्या तत्कालिन सहायक संचालिका आरती आळे यांनी त्यांच्याकडे दीड लाखांच्या लाचेची मागणी केली.

त्यानुसार लाचेची रक्कम यांनी स्वीकारली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. ‘लाचलुचपत’च्या चौकशीतून आळे यांनी तत्कालिन संचालक डॉ तेजस गर्गे यांना संपर्क साधून लाचेच्या रकमेतील त्यांच्या हिश्श्याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार, गर्गे आणि आळे या दोघांविरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Dr. Tejas Garge Bribe Crime
Nandurbar Bribe Crime : जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना अटक

मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. गर्गे पसार झाले आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तर, गर्गे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गर्गे यांच्या मुंबईतील घर ‘लाचलुचप’च्या पथकाने सील केले होते.

ते त्यांच्या पत्नी विशाखा यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात येऊन पथकाने घराची झडती घेतली आहे. यावेळी पथकाच्या हाती ३ लाख १८ हजारांची रोकड, बँकेत २० लाख रुपये आणि गर्गे दाम्पत्याचे पासपोर्ट हाती लागले आहेत. तसेच तीन टीबीच्या हार्डडिक्स हाती लागल्या असून त्याची तपासणी केली जाणार आहे.

Dr. Tejas Garge Bribe Crime
Nashik Bribe Crime : लाचखोर डॉ. गर्गेंचा ‘लाचलुचपत’ला गुंगारा! मुंबई उच्च न्यायालयात ‘अटकपूर्व’साठी धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.