नामपूर : अलियाबाद (ता. बागलाण) येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बीएसएनएलचे टॉवर असलेली दूरसंचार विभागाची इमारत कोसळल्याने लाखो रुपयांची यंत्रसामग्री उघड्यावर पडली आहे. या घटनेनंतर परिसरातील बीएसएनएलची फोन सेवा देखील ठप्प पडली आहे. (Telecom building collapsed in Aliabad)