NMC Charging Station : शहरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या माध्यमातून शहरात १०६ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग उभारले जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार असून स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी (ता.७) मान्यता दिली जाणार आहे. (nashik Tender for electric charging stations marathi news)
शहरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असली तरी चार्जिंग स्टेशन मात्र अपुरे आहेत. नॅशनल क्लीन एअर पॉलिसी (एन कॅप) अंतर्गत शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी की चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. (Latest Marathi News)
विद्युत विभागाने या संदर्भात निविदा प्रक्रीया राबवली असून त्यात निना हॅण्डस्, मरिन इलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेड, टेस्को चार्ज झोन लिमिटेड, मावेन कार्पोरेशन, शरिफाय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जिवाह इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तसेच युनिक एंटरप्रायझेस या सात कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. निविदांचे मूल्यमापन करून कमी दर भरणाऱ्या मक्तेदार कंपनीला काम दिले जाणार आहे.
चार्जिंग स्टेशन्सची ठिकाणी अशी
महापालिकेचे राजीव गांधी भवन, राजे संभाजी स्टेडिअम सिडको, बिटको हॉस्पिटल, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर महापालिका जागा, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, अंबड लिंकरोडवरील महापालिका मैदान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.