सातपूर : उद्योगांसाठी एकीकडे भूखंडाची मागणी होत आहे. काही प्रमाणात भूखंडाची समस्यादेखील सुटली आहे; परंतु ज्यांना भूखंड दिले गेले त्यातील काही ‘तुकडा गँग’चे सदस्य झाले आहेत. औद्योगिक विकास महामंडळाकडून भूखंड पदरात पाडून घेऊन त्यावर स्वतःचा उद्योग न उभारता त्याच प्लॉटचे एकापेक्षा अधिक तुकडे करून ते भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचे उद्योगदेखील ‘तुकडा गँग’मुळे सुरू झाले आहेत. त्यामुळे उद्योजकांसमोर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. (Terror of tukda gang in industrial estates plot leasing industry )