Nashik News : हृदयाचे 1 लाख ठोके मोजण्याची चाचणी विकसित!

Nashik News : हृदयरोगाची योग्‍य वेळी निदानातून वेळीच उपचार शक्‍य असून, त्‍यासाठी माधवबागतर्फे 'हार्टअटॅक के डर से आझादी' मोहीम हाती घेतली आहे.
At launch of Heart Attack Ke Der Se Azadi, the Managing Director of Madhavbaug Dr. Rohit Sane and Dr. Varg.
At launch of Heart Attack Ke Der Se Azadi, the Managing Director of Madhavbaug Dr. Rohit Sane and Dr. Varg.esakal
Updated on

Nashik News : भारतात दर ३३ सेकंदाला एक व्‍यक्‍तीचा हृदयविकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यू होतो आहे. बहुतांश रुग्‍णांची संख्या पन्नास वर्षांच्‍या आत असून, अनेकांना हृदयरोगाची लक्षणे देखील दिसून येत नाहीत. योग्‍य वेळी निदानातून वेळीच उपचार शक्‍य असून, त्‍यासाठी माधवबागतर्फे 'हार्टअटॅक के डर से आझादी' मोहीम हाती घेतली आहे. (Test developed to count 1 lakh heartbeats by madhavbaug)

याअंतर्गत हृदयाचे एक लाख ठोके मोजताना त्‍याचे रियल टाइम विश्‍लेषण केले जात असल्‍याची माहिती माधवबागचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रोहित साने यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्‍टरांच्‍या उपस्‍थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेत योजनेची माहिती डॉ.साने यांनी दिली.

ते म्‍हणाले, की साधारणतः एका व्यक्तीस दर मिनिटाला ७२ ठोके म्हणजेच २४ तासात सुमारे एक लाख ठोके पडतात. सध्या प्रचलित चाचण्यांमध्ये या एक लाख ठोक्यांपैकी फक्त काहीच ठोक्यांचा अभ्यास होतो. त्यामुळे चाचणीत काही आढळले नाही तरी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कायम असतो. (latest marathi news)

At launch of Heart Attack Ke Der Se Azadi, the Managing Director of Madhavbaug Dr. Rohit Sane and Dr. Varg.
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

हृदयाचा एकही ठोका न चुकवता २४ तासातील एक लाख ठोक्यांचे अचूक निदान करण्यासाठी माधवबागतर्फे 'हार्ट अटैक के डर से आज़ादी' मोहिमेअंतर्गत वायरलेस उपकरण विकसित केले आहे. अगदी लहान आकाराचे उपकरण हृदयाच्या बाजूस चिटकवले जाते. यामुळे प्रत्येक ठोक्यांचा व्यवस्थित अभ्यास करुन हृदयविकाराची जोखीम तपासता येऊ शकते, असे सांगितले.

आधी हृदयविकाराचा त्रास झालेल्यांना, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्थूलतेमुळे धाप लागत आहे, पायावर सूज आहे, छातीत सतत दुखत राहते. अशा सर्वांना ही चाचणी उपयुक्‍त ठरु शकते. नाशिक येथील माधवबागच्‍या शाखांमध्ये कार्यरत डॉक्‍टर यावेळी उपस्‍थित होते.

At launch of Heart Attack Ke Der Se Azadi, the Managing Director of Madhavbaug Dr. Rohit Sane and Dr. Varg.
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.