नाशिक : दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘टीईटी’ परीक्षेला (शिक्षक पात्रता परीक्षा) अखेर मुहूर्त लागला असून, राज्यभरात १० नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हयातील सुमारे २१ हजार ८७ भावी शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. २०१३ पासून टीईटी परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि ‘टीईटी’च्या बोगस प्रमाणपत्रांमुळे दोन ते तीन वर्षांपासून ही परीक्षा रखडली होती. (tet exam will be held on November 10 across state )