UGC-NET Exam : ‘नीट’साठी महाराष्ट्रातून एकही परीक्षार्थी नाही

Nashik News : अनेक कारणांनी वादाच्‍या भोवऱ्यात सापडलेल्‍या ‘नीट यूजी- २०२४’ परीक्षेचे मर्यादित स्वरूपातील विद्यार्थ्यांसाठी पुन्‍हा आयोजन केले जाणार आहे.
UGC-NET Exam
UGC-NET Examesakal
Updated on

Nashik News : अनेक कारणांनी वादाच्‍या भोवऱ्यात सापडलेल्‍या ‘नीट यूजी- २०२४’ परीक्षेचे मर्यादित स्वरूपातील विद्यार्थ्यांसाठी पुन्‍हा आयोजन केले जाणार आहे. येत्‍या रविवारी (ता. २३) एकूण एक हजार ५६३ विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे. दरम्‍यान, या परीक्षार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी नसल्‍याने राज्‍यात ही परीक्षा होणार नसल्‍याची माहिती ‘एनटीए’शी संलग्‍न अधिकाऱ्यांनी दिली. (There is no candidate from Maharashtra for UGC NET Exam)

अतिरिक्‍त गुणदान केल्‍याने नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) यूजी २०२४ परीक्षेच्‍या निकालानंतर अनेक गैरप्रकार समोर येत होते. देशातील काही भागांमध्ये या परीक्षेचा पेपर फोडल्‍याप्रकरणी संशयितांवर गुन्‍हे दाखल आहेत.

एकूणच संपूर्ण प्रकरणाविषयी वेगवेगळ्या याचिका न्‍यायालयात दाखल झालेल्‍या आहेत. यावर सुनावणीवेळी अतिरिक्‍त गुणदान रद्दबातल ठरविताना, न्‍यायालयाने अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याच्या या सूचना दिल्‍या होत्‍या. (latest marathi news )

UGC-NET Exam
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेला शासनाकडून ‘आर्थिक टेकू’

त्‍यानुसार ‘एनटीए’तर्फे या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्‍या रविवारी होणार आहे. एकूण एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार असून, यामध्ये एकही विद्यार्थी महाराष्ट्रातील नसल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

UGC-NET Exam
Nashik Police Recruitment: पोलीस भरतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापर! RFID चीप घेणार धावणे, उंची अन्‌ बायोमेट्रिक नोंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.