Nashik News : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम; येवला तालुक्यातील स्थिती

Nashik : अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जलस्रोतांना पाणी आलेले नसून गावोगावच्या नळपाणी योजना देखील सक्रिय झालेल्या नाही.
Due to good rain in the area, the water came to the well.
Due to good rain in the area, the water came to the well.esakal
Updated on

येवला : अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जलस्रोतांना पाणी आलेले नसून गावोगावच्या नळपाणी योजना देखील सक्रिय झालेल्या नाही. अर्थात पिण्यासाठी पाणी योजनासह विहिरी कूपनलिकांना तात्पुरते जीवदान मिळाले असले तरी अद्यापही टंचाईचे ढग कायमच आहेत. सद्या उपलब्ध पाण्यामुळे सोळा महिन्यानंतर मात्र टॅंकरला विश्रांती मिळाल्याचे समाधान आहे. ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या तालुक्यात मागील वर्षी पर्जन्यमानाने धोका दिला आहे. (There is no water in water sources and village tap water scheme has not been activated either )

अवघा ४२५ मिलिमीटर पाऊस पडला होता, त्यामुळे तालुक्यात खरिपाचा वणवा पेटून पालापाचोळा झाला होता. दोन वर्षात भूजल पातळीत मोठी घट झाल्याने पूर्ण पावसाळ्यात विहिरींना पाणी उतरले नसल्याने याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर जाणवत आहे. दोन वर्षात अत्यल्प पाऊस अन वाढत्या उष्णतेबरोबर तळपत्या सूर्याने तालुक्यातील भूगर्भातील पाणी खोलवर गेल्याचे चित्र गावोगावी आहे. याचमुळे तालुक्यात आत्तापर्यंत चार ते पाच वेळेस जोरदार पाऊस झाले असून खरिपाची पिकेही जोमात निघाली असली तरी जलस्रोतांना मात्र म्हणावे असे पाणी आलेले नाही.

पूर्व भागात तर अद्यापही अनेक विहिरी कूपनलिका बंद अवस्थेतच आहेत. छोट्या- मोठ्या बंधाऱ्याच्या आजूबाजूला असलेल्या जलस्रोतांना पाणी आल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा मिटला आहे. थोड्याथोड्या पावसावर भूजल पातळीत वाढ झाल्याने ३१ ऑगस्टला तालुक्यातील टॅंकर प्रशासनाने बंद केले असले तरी राजापूर व आहेरवाडी येथील टँकरचे प्रस्ताव मात्र प्रशासनाकडे पडून आहेत. पाच किलोमीटरच्या आजूबाजूला पाणी उपलब्ध असल्याने टँकर बंद करावे हा नियम असल्याने तात्पुरत्या स्वरूपात या गावांचे टँकर बंद झालेले आहेत. (latest marathi news)

Due to good rain in the area, the water came to the well.
Nashik News : ड्रेनेज तुंबण्याच्या समस्येमुळे सिडकोवासीय हैरान! रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी; उपाययोजना करण्याची मागणी

गंभीर म्हणजे उन्हाळ्यात तब्बल ११८ गावे वाड्यावर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती उन्हाळ्यात उद्भवली होती. टॅंकरची मागणी असताना पाणी आहे, या कारणास्तव टँकर बंद झाले आहेत, मात्र उपलब्ध पाणी तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. मागील पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पिकांना शेतीपंपाद्वारे पाणी देणे सुरू करताच विहिरी व कूपनलिकांचा उपसा व्हायला लागला आहे. त्यामुळे पिण्याची पाण्याची गरज तात्पुरत्या स्वरूपातच भागणार हे स्पष्ट आहे.

अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दिवाळीपासून पुन्हा तालुक्याला पाणी टँकरची गरज भासणार हे स्पष्ट आहे. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ५५ वर गावे वाड्या टँकरमुक्त झाल्या आहेत. अनेक गावांना स्थानिक जलस्रोतावर पाणी योजना आहेत. या योजना सद्यःस्थितीत सुरू झाल्या आहेत, त्यातच पालखेड डाव्या कालव्याला ओव्हरफ्लॉवरचे पाणी सुरू असल्याने लाभ क्षेत्रातील गावांचेही बंधारे भरून जलस्रोताना पाणी मिळाल्याने तेथील प्रश्न मिटला आहे. उत्तर पूर्व भागात मात्र टंचाई तात्पुरतीच मिटल्याने या भागाला लवकरच टँकरची गरज भागेल अशी स्थिती आहे.

आता नवरात्राकडूनच अपेक्षा!

तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही.पूर्व भागातील विहिरी अद्यापही पाणी उतरले नसल्याची स्थिती असून गणपती बाप्पा पाऊस घेऊन येईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही नदी नाले भरून वाहणारा पाऊस पूर्व भागात अद्यापही नसल्याने आता येणाऱ्या नवरात्रोत्सवाकडूनच जोरदार पावसाची अपेक्षा तालुकावासियांना लागून आहे.

Due to good rain in the area, the water came to the well.
Nashik News : शेंद्रीपाडाच्या नशिबी अजूनही पायपिटच! अनेक मंत्री आले अन गेलेही...रस्ता मात्र जैसे थेच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()