नाशिक औष्णिक वीज केंद्र लॉकडाउननंतर कायमचे लॉक?

nashik thermal power station.png
nashik thermal power station.png
Updated on

नाशिक : (एकलहरे) लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्र काही प्रमाणात सुरू झाले आहे. विजेची मागणीही वाढली आहे. मात्र तरीही नाशिक वीज केंद्र अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे राज्यातील सातही वीज केंद्रांत अव्वल स्थानावर असताना केंद्र बंद पडते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

हजारो कंत्राटी कामगार बेरोजगार होणार

महानिर्मितीचे सात वीज केंद्रांपैकी फक्त पारस, चंद्रपूर, खापरखेडा व परळीचे केंद्र सुरू आहेत. नाशिक, भुसावळ व कोराडी येथील केंद्र पूर्णतः बंद आहेत. 
नाशिक येथील संच मस्ट रनमध्ये असतानाही लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंदच आहेत. आता काहीअंशी औद्योगिक वसाहती सुरू झाल्या असून, मागणीही वाढली आहे. तरीही नाशिकचे संच सुरू न झाल्याने कामगारांत भीतीचे वातावरण आहे. येथील संच सुरू न झाल्यास हजारो कंत्राटी कामगार बेरोजगार होणार आहेत.

मागणी 22 हजारांवरून 13-14 हजार मेगावॉटवर

गेल्या तीन महिन्यांपासून एमओडीचे दर पाहाता वीज केंद्र सुरू होण्याची सुतराम शक्‍यता नाही. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाल्यावर औद्योगिक मागणीत कमालीची घट झाल्याने मागणी 22 हजारांवरून 13-14 हजार मेगावॉटवर आली होती. सध्या मागणी 16-17 हजार मेगावॉटवर गेली आहे. तरी येथील संचांना चालना मिळाली नसल्याने अनेक चर्चांना ऊत आला आहे. 

नाशिकची आशा धूसर 

महावितरणचा वीज खरेदी करार वीज केंद्र सुरू होतानाच झालेला असतो. त्यामुळे सध्या खासगीला प्राधान्य दिले जात आहे. नाशिक, कोराडी व भुसावळचे निर्मिती दर मेरिट ऑर्डर डिसपॅचमध्ये जास्त असल्याने, तसेच यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने नाशिकची चिमणी पेटेल, याची आशा धूसर झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()