एकलहरे (नाशिक) : वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे व कोळसा तुटवड्याला अख्खा देश सामोरे जात असतांना नाशिकचा एकमेव बंद असलेला संच आज दुपारी कार्यान्वित होऊन आज महानिर्मितीचे 27 पैकी 27 संच सुरू झाले. त्यामुळे अडचणीच्या काळात नाशिक कायम राज्याच्या मदतीस धाऊन आलेय हे सिद्ध झाले. (Nashik Thermal Power Station Record Power Generation)
राज्यात कोळसा टंचाईमुळे भारनियमनची परिस्थिती उद्भवली असतांना महानिर्मितीच्या इतिहासात गेल्या 60 वर्षांत 27 पैकी 27संचांमधून वीज निर्मिती झाली नव्हती. आज नाशिकचा एकमेव बंद असलेला संच सुरू झाला व कामगारांसह अधिकारी अभियंता यांनी हुश्श म्हटले.
राज्यासह देश पातळीवर सध्या कोळसा तुटवड्याची समस्या आहे. या सर्वांवर मात करीत महानिर्मितीने देशातील 2 क्रमांकाची सर्वात जास्त वीज निर्मिती करणारी कंपनी असल्याचे सिद्ध केले.
काही वर्षांपासून महानिर्मितीचे संच मोठ्या प्रमाणात झिरो शेड्युल तर तांत्रिक कारणांमुळे व पाण्यामुळे बंद रहात होते. नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र. 4 हा पहाटे प्रज्वलित करण्यात आला व दुपारी 1-2 वाजेच्या सुमारास यातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.
पहाटे पासून ते दुपारी 2 पर्यंत मुख्य अभियंत्यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी संच कार्यान्वित होईपर्यंत तळ ठोकून होते. नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ या सहा ही केंद्रातील एकूण 27 संच सुरू आहेत.
नाशिकच्या तिसऱ्या संचांमधून ही वीजनिर्मिती सुरू होऊन महानिर्मितीचा सर्व संच सुरू राहण्याचा उच्चांक आज झाला. कामगार अभियंत्यांची कमतरता असल्याने तिसरा संच सुरू करण्यास अडचणी येत होत्या. मात्र ट्रेनिंग सेंटर हुन तंत्रज्ञ 2-3 व मुख्यालयाकडून डेपुटेशन वर आलेल्या अभियंत्यांच्या साहाय्याने तिसरा संच आज कार्यान्वित करण्यास स्थानिक प्रशासनाला यश आले.
आज दुपारी नाशिक 372 मेगावॅट, कोराडी 17027, खापरखेडा 997, पारस 381, परळी 535, चंद्रपूर 2210, भुसावळ 643 मेगावॅट तर वायू वीज केंद्र उरण येथे 230, जलविद्युत 613 व सोलर 86 अशी एकंदरीत 8322 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती. या कालावधीत राज्याची वीजेची मागणी 27988 होती तर सर्व स्तोत्रातून 18300 मेगा वॅट वीजनिर्मिती सुरू होती. उर्वरित 9750 मेगा वॅट सेंट्रल च्या हिस्स्यातून घेऊन गरज भागवली जात होती. 27 पैकी 27 संच सुरू झाले ही महानिर्मितीसाठी गौरवास्पद असल्याचे मुख्य अभियंता नवनाथ शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले
गत दीड महिन्यांपासून नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या तिसऱ्या संचास शेड्युल भेटूनही स्टाफ कमतरता होती. वीज तुटवड्याच्या काळात तिसरा संच पुन्हा 2 वर्षानंतर सुरू झाल्याने कामगारवर्गात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.