Nashik Crime News : चोरट्यांनी 3 फ्लॅटचे कडीकोयंडे तोडून घरफोड्या! 3 लाखांचा मुद्देमाला लंपास

Nashik News : काच अपार्टमेंटमधील दोन तर लगतच्या दुसर्या अपार्टमेंटमधील एक असे तीन फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल चोरून नेत भरदिवसा घरफोड्या केल्या आहेत.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : म्हसरुळ परिसरातील एकाच अपार्टमेंटमधील दोन तर लगतच्या दुसर्या अपार्टमेंटमधील एक असे तीन फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल चोरून नेत भरदिवसा घरफोड्या केल्या आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves broke lock of 3 flats and broke into houses issue of three lakhs)

शैला किरण निकम (रा. महिंद्रा रेसीडेन्सी, प्रभातनगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १९) सकाळी ११ ते ४ या दरम्यान अज्ञात चोरट्यांने त्या राहत असलेल्या इमारतीतील फ्लॅट नं. चारचा कडीकोयंडा तोडून १५ हजारांची रोकड, २ लाखांची सोन्याची पोत, ७५ हजारांचे सोन्याचे कानातील झुबे, एटीएम कार्ड असा ऐवज चोरून नेला.

चोरट्यांनी या इमारतीतील मयुर पुंडलिक उगले यांचा ३० हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. यानंतर या चोरट्यांनी लगतच असलेल्या केतकीनगरमधील सिद्धीविनायक अपार्टमेंटमील सविता सुरेशचंद्र बाविस्कर यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ४० हजारांचे सोन्याचे चोख बिस्किट.(latest marathi news)

Nashik Crime News
Crime News : विद्यार्थ्याने विळ्याने चिरला स्वत:चा गळा! काय आहे कारण?

६ हजारांची रोकड, ३० हजारांचे सोन्याचे कानातील टॉप्स असा सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भरदिवसा व एकाच परिसरात झालेल्या या घरफोडीच्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News
Crime News : विद्यार्थ्याने विळ्याने चिरला स्वत:चा गळा! काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.