V. N. Naik Institution Election : थोंरेंना चौथ्या गटाचे बळ मिळाल्यास तिरंगी लढत; माघारीचा आज अंतिम दिवस

Election : पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्‍या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्‍या पाच उमेदवारांनी माघारीसाठी सात अर्ज दाखल केले.
V.N. Naik Education Institute Election
V.N. Naik Education Institute Electionesakal
Updated on

V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्‍या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्‍या पाच उमेदवारांनी माघारीसाठी सात अर्ज दाखल केले. शनिवारी (ता. १३) माघारीची अंतिम मुदत असल्‍याने दिवसभर वेगवान घडामोडींची शक्यता आहे. त्यासोबतच पॅनलबाबतची अधिकृत घोषणा होऊन प्रचाराचे श्रीफळ वाढविले जाईल. (Three way fight if Thorn gets strength of fourth group of V N Naik Institution Election)

दरम्‍यान, निवडणुकीत चाचपणी सुरू असलेल्‍या चौथ्या गटाचे पंढरीनाथ थोरे यांना बळ मिळण्याची शक्‍यता असून, असे झाल्‍यास तिरंगी लढत होईल. यंदाच्‍या निवडणुकीत प्रामुख्याने हेमंत धात्रक व ॲड. तानाजी जायभावे यांचे पॅनल तसेच कोंडाजीमामा आव्‍हाड, माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे दुसरे पॅनल, तर पंढरीनाथ थोरे यांचे तिसरे पॅनल असेल.

अभिजित दिघोळे आणि मनोज बुरकुले यांच्‍याकडून चौथ्या पॅनलची चाचपणी केली जात होती. परंतु श्री. दिघोळे व श्री. बुरकुले हे थोरे यांच्‍या पॅनलमधून प्रमुख पदावर निवडणूक लढविणार असल्‍याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत स्‍पष्टता शनिवारी (ता. १३) पॅनलची घोषणा झाल्‍यावर होऊ शकेल. त्‍यामुळे आता तिरंगी की चौरंगी लढत, याकडे सभासदांमध्येही उत्‍सुकता आहे. (latest marathi news)

V.N. Naik Education Institute Election
V. N. Naik Institution Election : 3 पॅनल तयार; चौथ्याची चाचपणी! छाननीत 9 अर्ज बाद

यांनी घेतली माघार...

सात उमेदवारांनी शुक्रवारी (ता. १२) माघार घेतली. यामध्ये संदीप कातकाडे यांनी अध्यक्ष व सहचिटणीस पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. सुनील केदार यांनी विश्‍वस्‍तपदासाठी, तर सुनीता दराडे यांनी महिला सदस्य पदाचा अर्ज माघारी घेतला. कार्यकारिणी सदस्‍यपदासाठी अर्ज केलेल्या सुनील केदार (दिंडोरी), साहेबराव दराडे आणि संजय सानप (निफाड) यांनीही अर्ज मागे घेतले.

असे आहे पॅनलचे संभाव्‍य गणित...

ॲड. तानाजी जायभावे अध्यक्ष, हेमंत धात्रक सरचिटणीस, ॲड. पी. आर. गिते उपाध्यक्ष व दिगंबर गिते सहचिटणीस असे एक पॅनल उभे राहात आहे. दुसऱ्या पॅनलमध्ये कोंडाजीमामा आव्‍हाड अध्यक्ष, बाळासाहेब सानप सरचिटणीस यांच्‍यासह जयंत सानप उपाध्यक्ष व उदय घुगे सहचिटणीस पदासाठी लढत देऊ शकतात.

तिसऱ्या पॅनलमध्ये पंढरीनाथ थोरे अध्यक्ष, तर मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांना उपाध्यक्ष व सरचिटणीसपदासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय शिवाजी मानकरही महत्त्वाच्‍या पदासाठी रिंगणात उतरतील. दरम्‍यान, कोण कुठल्‍या पॅनलमधून उमेदवारी करते हे शनिवारीच (ता. १३) स्‍पष्ट होणार आहे.

V.N. Naik Education Institute Election
V. N. Naik Institution Election : बिनविरोधचे आवाहन, एकाचीही नाही माघार!उद्यापर्यंत माघारीची मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.