नाशिक : सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे दहशतवादविरोधी कारवाईमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) जाहीर करण्यात येते. यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, येवला येथील सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे, तर नाशिक शहर आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके आणि निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. (To Superintendent Deshmane Announced Central Home Minister Vigilance Medal)