Junior College Admission : अकरावी कोटा अंतर्गत प्रवेशाची आज अंतिम मुदत

College Admission : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत नियमित विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर आता विशेष फेरीद्वारे रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
Admission
Admission esakal
Updated on

Junior College Admission : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत नियमित विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर आता विशेष फेरीद्वारे रिक्त जागा भरण्यात येत आहेत. कोटा अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाऊस या जागांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची बुधवारी (ता.३१) अंतिम मुदत आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी येत्या शनिवारी (ता.३) प्रसिद्ध केली जाणार आहे. (Today is last date for admission of 11th )

गुणवत्ता यादीतील पात्र विद्यार्थ्यांना ५ ते ८ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घेता येणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेत नियमित विद्यार्थ्यांनी नामांकित महाविद्यालयांमध्ये आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. यानंतरही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत (कॅप) विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ऑगस्ट रोजी यादी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांनाही एसएमएस द्वारा कळविण्यात येणार आहे. ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान प्रवेश ऑनलाइन प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू राहील. यामध्ये प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे. प्रवेश घेण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश तेथे निश्चित करावा. (latest marathi news)

Admission
Junior Collage Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून; अर्जांची आज अखेरची संधी

प्रथम पसंती क्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला वा प्रवेश रद्द केल्यास अशा विद्यार्थ्यांना या पुढील कोणत्याही फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाणार नाही. तथापि विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करणे आवश्यक आहे. पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग १ हे भरणे सुरू राहील. मात्र अर्ज भाग १ मध्ये अनलॉक व दुरुस्ती करता येणार नाही.

अर्धे वर्ष संपले तरी प्रवेश सुरु

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील अर्धे महिने संपत आले तरी अजूनही प्रवेश प्रक्रिया अंतिम झालेली नाही. नियमितपणे वर्ग सुरु झाले तर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे शक्य होईल. अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून काही मिटायला वाट बघावी लागणार आहे. आता कुठे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र जुलै अखेरपर्यंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी महाविद्यालयांची धावपळ होणार आहे.

Admission
Junior College Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता जाहीर; 3 हजार 644 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.