Nashik News : मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील रस्ता चौकशीचा खेळ सुरू आहे. या रस्ता चौकशीची तक्रार करणारे विठोबा द्यानद्यान यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारींमुळे चारवेळा चौकशी झाली आहे. मात्र, या चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने द्यानद्यान यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर पुन्हा जिल्हा परिषदेला चौकशीचे आदेश मिळाले असून त्यानुसार जि. प. ग्रामपंचायत विभागाने रस्ता कामाच्या चौकशीचे पाचव्यांदा आदेश काढले आहेत. (Tokde road investigated for fifth time)