Nashik Tomato Rate Fall : यंदाच्या हंगामातील सुरुवातीला महिनाभरात चांगले दाम हाती टेकवत उत्पादक शेतकऱ्यांच्या गालावर लाली आणणाऱ्या ‘टोमॅटो’ने गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. कसमादे पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक सुरत (गुजरात) मार्केटला विक्रीसाठी जातात. (nashik tomato rate fall in district marathi news)
वाहतूक भाडे व तोडणी खर्च पाहता उत्पादकांच्या हाती २० किलो क्रेट्सला ३५ ते ४० रुपये मिळत असल्याने केलेला खर्च वसुल होईना, अशी बिकट अवस्था झाली आहे. यंदा विहिरींची पाणीपातळी खालावली. मोठ्या परीश्रमातून टोमॅटो पीक भाव राहिल, या अपेक्षेने घेतले. परंतु, ऐनवेळी भाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. ऐन सणासुदीला भाव घसरल्याने गुढीपाडव्यासारखा पवित्र सणाला घरात पाहिजे, तसा उत्सव नाही.
या पिकासाठी रोप लागवड, निंदणी, फवारणी, रासायनिक खते, लिक्वीड, बांधणी मजुरीसाठी अफाट खर्च उत्पादकांनी केला. परंतु, कमी भाव झाल्याने निराशा झाली. यंदा विहीरीचे पाणी कमी असल्याने लागवड कमी राहिल व भाव मिळेल, या आशेवर २० ते २५ गुंठे लागवड करणाऱ्या उत्पादकांचा खर्च निघेनासा झाला आहे.
हाती होते तेही गेले...
विहिरींनी तळ गाठला तरी भाव राहिल या आशेवर पिक वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हाती असलेला पैसा पाण्यात घालून पीक वाचविले. परंतु, अल्प दराने निराशा केली. (latest marathi news)
२० गुंठ्यासाठी येणारा खर्च
रोप : ३ हजार ७५० रुपये
पेपर बंडल : ७ हजार
नळी ३ बंडल : १७००
सुतळी : ३६००
बांबू : १०००
तार : २५००
मजुरी : १० हजार
फवारणी : ७ ते ८ हजार
सध्या मिळणारा भाव
एक क्रेट्स (२० किलो) : १०० ते १२० रुपये
क्रेट्स भाडे सुरत मार्केट : ६५ रुपये
तोडणी खर्च : १५ रुपये
''दरवर्षी आमच्या परीसरात टोमॅटो पिक कमीअधिक प्रमाणात घेतले जाते. सणासुदीला दोन पैसे हाती येतील, ही अपेक्षा यंदा फोल ठरली. मालकाढणी सुरू होताच भाव घसरल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.''- रवींद्र अहिरे, टोमॅटो उत्पादक, केरसाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.