Nashik Tomato Rate Fall: टोमॅटोच्या 3 लाख क्रेटची आवक; पिंपळगाव बाजार समितीत भावात घसरण सुरूच

A long queue of vehicles came to sell tomatoes in the market committee on Wednesday.
A long queue of vehicles came to sell tomatoes in the market committee on Wednesday.esakal
Updated on

Nashik Tomato Rate Fall : दोन महिन्यांपूर्वी तीन हजार प्रतिक्रेट्‌सटपर्यंत दराची लाली चढल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोची उदंड लागवड केली. त्याचा परिणाम मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन बाजारभाव शंभर रुपयांच्या आत घसरले आहेत.

बुधवारी (ता. २०) पिंपळगाव बाजार समितीत रेकॉर्ड ब्रेक सुमारे तीन लाख क्रेट्‌सची आवक झाली. जिल्ह्याभरातून सुमारे तीन हजार जीप-पीकअप येथे आल्याने जोपूळ व चिंचखेड चौफुलीवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

बाजार समितीचे आवार वाहनांनी हाऊस फुल्ल झाले होते. त्यामुळे प्रवेशद्वारापासून एक किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सर्वत्र टोमॅटोचा बोलबाला दिसत होता. अभूतपूर्व गर्दी पिंपळगाव बाजार समितीचे आवार गजबजले. (Nashik Tomato Rate Fall Inflow of 3 lakh crates of tomatoes Prices continue to fall in Pimpalgaon Market Committee)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

A long queue of vehicles came to sell tomatoes in the market committee on Wednesday.
Nashik Onion News : नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला! दादा भुसेंच्या व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच

दरम्यान, मागणी अल्प असताना, सुमारे तीन लाख क्रेट्‌सची आवक झाल्याने बाजारभाव ७० ते ९० रुपये प्रतिक्रेट असा राहिला. वाहतूक खर्चही परवड नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली.

कांदा लिलाव ठप्प

विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी बुधवारी लिलाव बंद पुकारल्याने कांदा लिलाव ठप्प राहिले. पिंपळगाव बाजार समितीत कांदा विक्री आवारात दिवसभर शांतता होती. कांदा विक्रीतून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल बुधवारी थांबली.

A long queue of vehicles came to sell tomatoes in the market committee on Wednesday.
Nashik Onion News : नाशिक बाजार समितीत शुकशुकाट; कांदा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.