Nashik Tomato Rate: टोमॅटोच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक घसरण! उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Tomato
Tomato esakal
Updated on

Nashik Tomato Rate : ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नेपाळ येथून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने पंजाब, कर्नाटक राज्यांतून पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीत २० ते २५ हजार टोमॅटोचे क्रेट्स येण्यास सुरवात झाली आहे.

येथील बाजार समितीच्या प.पू. भगरीबाबा भाजीपाला आवारात टोमॅटोचे शुक्रवारी (ता. ११) ५० टक्क्यांहून अधिक दर घसरले. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेट्सला जास्तीत जास्त १०० रुपये, तर कमीत कमी २००, तर सरासरी ९०१ रुपयांपर्यंत दर खाली आले.

आणखी दर घसरण्याच्या भीतीमुळे टोमॅटो उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Nashik Tomato Rate More than 50 percent drop in tomato price Increasing concerns of productive farmers)

उत्तरेकडील राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या मागणीत अचानक वाढ झाली. पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक पाच ते सहा हजार क्रेट्स होत होती.

२० किलोच्या कॅरेट्सला २३०० ते २५०० रुपये बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण होत. सोमवारी (ता. ७) टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेट्सला जास्तीत जास्त २,३०१, कमीत कमी ५०० रुपये, तर सरासरी १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

"गेल्या चार ते पाच वर्षांनंतर टोमॅटोच्या बाजारभावात तेजी निर्माण झाल्याने टोमॅटो उत्पादकांना ‘अच्छे दिन’ आले होते. नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा घाईगडबडीच्या निर्णयामुळे टोमॅटो मातीमोल बाजारभावने विकण्याची भीती व्यक्त होत असून, ही वेळ टोमॅटो उत्पादकांवर येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना फुकट वाटावेत, तसेच जास्तीत जास्त टोमॅटो देशाबाहेर निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा."

-शिवा सुरासे, शेतकरी, टाकळी (विंचूर)

"वांग्याला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने वांग्याचे पीक उपटून फेकून द्यावे लागले होते. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने वांग्यात झालेली नुकसान टोमॅटोतून भरून काढता येईल, यासाठी अर्ध्या एकरावर टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोला चांगला भाव मिळत असताना, केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दररोज टोमॅटोच्या दरात घसरण होत असून, वांग्यासारखीच परिस्थिती टोमॅटोची होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि जास्तीत जास्त टोमॅटोची निर्यात करावी."

-सुनील गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव (विंचूर)

Tomato
NMC News : खासगी मालमत्ता महापालिका सांभाळणार; विद्युत विभागाचा अजब प्रकार

पिंपळगावला प्रतिक्रेट्‌स हजार रुपये

केंद्र शासनाने नेपाळमधून आयातीचे धोरण स्वीकारल्याने व बंगळुरुच्या बाजारपेठेत अचानक वाढलेल्या आवकेमुळे टोमॅटोच्या दरात जोरदार घसरगुंडी झाली. दोन हजार रुपयांचा दर एकाच दिवसात निम्म्यावर येत हजार रुपये प्रतिक्रेट्‌सपर्यंत कोसळला.

टोमॅटोच्या दराची लाली ओसरल्याने केंद्र शासनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या महिन्याभरापासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्रेट्‌स असा स्वप्नवत भाव मिळत होता.

टोमॅटोचे दर सर्वकालीन उंचीवर पोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या उलट चित्र ग्राहकांंमध्ये होते. परराज्यात किरकोळ बाजारात ग्राहकांना दोनशे ते अडीचशे रुपये किलोने खरेदी करावा लागत होता.

दरवाढीवरून ग्राहकांची ओरड होऊ लागल्याने टोमॅटोची नेपाळमधून आयात करण्याचे धोरण केंद्र शासनाकडून जाहीर होताच त्याचे पडसाद बाजारभाववर उमटले. आशिया खंडात टोमॅटोची राजधानी अशी ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोच्या दर पत्यासारखे कोसळले.

सरारी हजार रुपयांपर्यंत प्रतिक्रेट्‌स बाजारभाव व्यापाऱ्यांकडून पुकारण्यात आले. यावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. मात्र, टोमॅटो नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने मिळेल त्या भावात सौदा द्यावा लागला.

बंगळुरुमध्ये आठ लाख क्रेट्‌सची आवक

नेपाळमधून आयातीच्या वृत्ताबरोबरच बंगळुरुच्या बाजारपेठेत चौपट आवक टोमॅटोच्या दरासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरला. बंगळुरुच्या कोल्हार बाजारपेठेत पाच लाख, तर चिंतामणी बाजारपेठेत तीन लाख क्रेट्सची आवक झाली.

यासह सोलापूर, लातूर येथे आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पिंपळगाव बसवंत बाजार समिती दहा हजार क्रेट्‌सची आवक होऊन सरासरी हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Tomato
Simhasth Kumbhmela : आपत्तीशी लढण्यासाठी अद्ययावत साहित्य; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीस प्रारंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()