नेपाळमधील मत्स्यार्गंडी नदीत बस कोसळून जळगाव जिल्ह्यातील २७ भाविकांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. यानिमित्त प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन करताना काही नियमांचे व आचारसंहितेचे पालन करण्याची आवश्यकता घटनेनंतर निर्माण झाली आहे.
पर्यटन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे व होत राहणार परंतु नियमांचे पालन पर्यटक व पर्यटन आयोजित करणाऱ्या टुर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून होणे गरजेचे असल्याचा धडा यानिमित्त मिळाला आहे. हा धडा गिरविला तरच पर्यटनाची लहर कायम राहील. अन्यथा भीतीमुळे पर्यटक बाहेर पडणार नाही. घटनेच्या निमित्ताने नाशिकच्या पर्यटनक्षेत्राचा घेतलेला आढावा व पर्यटनाला जाताना पर्यटकांसाठी माहिती. (Tourism increased take precautions for security)