Nashik Tourism Sector : निसर्गाने मुक्तहस्ते नाशिक शहराला भरभरून नैसर्गिक सौंदर्याची देणगी दिली आहे. पावसाळ्यात वीकएंडला इतर शहरातून नाशिकला २५ ते ३० हजार पर्यटक भेटी देतात. पर्यटकांनी शहरात प्रवेश करताच धुक्याच्या शहरात हरविल्याचा पहिलाच अविस्मरणीय अनुभव पर्यटकांना मिळतो. म्हणूनच नाशिक शहराला फॉग सिटी नावाची ओळख मिळाली आहे.
वीकएंडला मुंबई पुण्याहून नाशिकला पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकाला शहरात अनेक पर्यटनाचा मार्ग खुले आहेत. मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेले धार्मिक पर्यटन, वाइन कॅपिटल, ट्रेकिंगसाठी असणारे गडकिल्ले या अनेक पयार्यांमुळे नाशिक शहराकडे पुणे मुंबईकरांचे पावले वळतात. एवढंच काय तर निवृत्ती नंतर नाशिक शहरात नागरिक स्थायिक होतात. (25 to 30 thousand tourists visit nashik)