Nashik News : भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी! पोलिस अधिक्षकांच्या आदेशाची पायमल्ली

Nashik News : गेल्या तीन-चार दिवसांपासून इगतपुरी परिसरात संततधार सुरु असल्याने रविवारी (ता. १४) मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली.
Crowd of tourists at the waterfall and Untdari.
Crowd of tourists at the waterfall and Untdari.esakal
Updated on

इगतपुरी शहर : गेल्या तीन-चार दिवसांपासून इगतपुरी परिसरात संततधार सुरु असल्याने रविवारी (ता. १४) मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली. मात्र, भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू असून, जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेचा वापर करीत आहे. पर्यटक डोंगराच्या कडेवर उभे राहून सेल्फी घेताना दिसत आहेत. (Tourist in Bhavali Dam area Violation of orders of Superintendent of Police)

पर्यटकांनी पोलिस अधिक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. लोणावळ्याच्या घटनेवरून पर्यटक व प्रशासन कोणताही बोध घेताना दिसत नाही.

तसेच, मद्यपान करणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धाक नसल्याने मोठी दुर्घटना नाकारता येत नाही. पावसाचे माहेरघर अशी इगतपुरीची ओळख व धुक्याचे शहर अशीही ओळख आहे. (latest marathi news)

Crowd of tourists at the waterfall and Untdari.
Nashik Sports Complex : क्रीडा संकुलातील ‘खो-खो’चा फलक फाडला! क्रीडा संघटनेकडून निषेध

पाऊस पडला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांची पाऊले आपोआप इगतपुरीकडे वळतात. इगतपुरी येथील उंटदरीनेही धुक्याची चादर पांघरल्याचे दिसत आहे.

या उंटदरीत व आजूबाजूच्या परिसरात पसरलेल्या दाट धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इगतपुरीत दाखल होत आहेत. मात्र, आनंदाच्या भरात नियमांचे उल्लंघन होत असल्याने त्याचा त्रसा इतरांना होत आहे.

Crowd of tourists at the waterfall and Untdari.
Nashik News : मालेगाव सामान्य रुग्णालय होणार 300 खाटांचे : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.