जुने नाशिक : भद्रकाली परिसरात अवैध धंद्याचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. नागरिकांसह येथील व्यापारी वर्गास विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत भद्रकाली भाजी मार्केट येथे चौक सभा घेतली. अवैध धंद्याविरुद्ध एल्गार करत त्वरित कारवाईची मागणी केली. (Nashik Traders unite against illegal business in Bhadrakali marathi news)
भद्रकाली परिसर अवैध धंद्यांचे माहेरघर असा वर्षानुवर्षे समज आहे. त्या तुलनेत काही प्रमाणात अवैध धंदे कमी झाले आहेत. मात्र काही ठराविक भागात आजही धंद्यांचे प्रमाण अधिक आहे. भद्रकाली, तलावडी परिसराचा त्या भागात समावेश होतो. देहविक्रीचा व्यवसाय याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून देहविक्री करणाऱ्या महिला सर्रास येथील रस्त्यांवर फिरतात.
ग्राहकांसाठी अश्लील हावभाव करतात. याच भागात मुख्य बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या महिलांकडेही नागरिकांकडून त्याच नजरेने बघितले जाते. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम खरेदी-विक्रीवर होत आहे. याशिवाय चोरीचे प्रमाणही मोठे आहे.
रिक्षा चालकांची मुजोरी आणि काही दुकानदार त्यांच्या दुकानापासून दहा फूट बाहेर दुकान लावतात. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते. त्याचप्रमाणे अवैधरीत्या मद्य विक्री होते. टवाळखोर आणि गावगुंड येऊन लूटमार करतात. (Latest Marathi News)
दिवसेंदिवस नशेबाजांचे वाढते प्रमाण, अमली पदार्थांची सर्रास होणारी विक्री याचाही त्रास परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना होत आहे. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने व्यापारी त्रस्त झाले होते. त्यांनी रस्त्यावर उतरत भद्रकाली मार्केट मैदानात एकत्र येत अवैध धंद्याचा विरोध केला.
आमदार फरांदेंची उपस्थिती
झालेल्या चौक सभेत आमदार देवयानी फरांदे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी उपस्थिती लावली. त्यांच्याकडे व्यापाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. तसेच त्वरित कारवाई करत येथील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावेत.
बाजारपेठेच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिला आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. बाजारपेठ भागातील देहविक्रीचे अड्डे (लॉज) बंद करावेत, अशा मागण्या केल्या. यावेळी परिसरातील विविध व्यावसायिक आणि व्यापारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.