नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम, आणि इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघांसाठीची मतमोजणी शहरातील चार केंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर समर्थक, कार्यकर्त्यांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहर वाहतूक शाखेने शनिवारी (ता. २३) मतमोजणीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल केले असून, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी केली आहे.